तरुण भारत

ऐसे तव मार्गा अनेक

रुक्मिणी भगवान श्रीकृष्णाला पुढे म्हणाली –

तयां पामरां नृपांभेणें । समुद्रा शरण ठालों म्हणणें ।

Advertisements

जाडय़ मांद्य या भाषणें । म्हणावें कोणें परकीयें ।

आणि अस्पष्टवर्त्मनां आम्हां । ज्या ज्या आश्रयिती पैं वामा ।

त्या त्या पात्र होती भ्रमा । मेघश्यामा हें वदलां ।

हेंही मांद्याचिमाजी पडे । बोलें न शकवे जरी भिडे ।

प्रेमसंरंभाचिये चाडे । बोलणें आवडे तरी ऐका ।

रुक्मिणी भगवंताला म्हणते – हे गदाग्रजा ! आपण राजांच्या भीतीने समुद्रात निवास करू लागलात, हे आपले म्हणणे तर्कसंगत वाटत नाही. कारण आपण केवळ आपल्या शार्ड्ग्.धनुष्याच्या टणत्काराने माझ्या विवाहासाठी आलेल्या सर्व राजांना पळवून लावून मला पळवून आणलेत. जसा सिंह आपल्या आरोळीने वनातील पशूंना पिटाळून लावून आपला भाग घेऊन येतो.

ज्या तुमचिया भजनासाठीं । विरक्त भूप कोटय़ानकोटी ।

भववैभवा देवोनि पाठी । लागले वाटीं भजनाचे ।

तया नृपांचे शिखामणि । श्रे÷ श्रे÷ वदती वाणी ।

ते परिसावे चक्रपाणि । जे पुराणीं विख्यात् ।अंगनामा पृथूचा आजा । वैन्य पृथूचि गरुडध्वजा ।

जायंतनामें भरत सहजा । अंबरीषादि सर्वही ।

नाहुष नाम यदूचा जनक । गयभूपाळ पुण्यश्लोक ।

ऐसे तव मार्गा अनेक । आश्रयूनियां राहिले ।

ते दुःखाचें पात्र झाले । ऐसें कोणीं कैं ऐकिलें ।

तव पदपद्मामृतें धाले । ते समरसले सायुज्यीं ।

आमुच्या मार्गा जे आश्रयिती । ते दुःखाचें पात्र होती ।

ऐसी गोष्टी जे अघडती । शोभे निश्चिती स्वामींतें ।

असो आणिकी ऐकें परी । आढय़ां अकिंचनां न घडे सरी ।

आपणा अनुरूप भूप विचारिं । कां हे वैखरी मंद नव्हे ।

रुक्मिणी श्रीकृष्णाला पुढे म्हणते – हे कमलनयना ! जे माझ्या मागे लागतात, त्यांना साधारणपणे कष्टच भोगावे लागतात. असे आपण कसे म्हणता? प्राचीन काळी अंग, पृथू, भरत, ययाती, गय इत्यादी राजराजेश्वर आपापले एकछत्री साम्राज्य सोडून ज्या आपल्याला प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये गेले होते; त्यांना आपले अनुयायी होण्यामुळे काही कष्ट झाले काय?

तूं जो अनंतगुणपरिपूर्ण । अनंत अमोघ नामेंकरून ।

कालत्रयीं विराजमान । जगदुद्धरण यशोगानें ।

यश वर्णितां उरगपति । पार न पावोनि झाला सुपति ।

मौनावल्या श्रुति स्मृति । नव नव कीर्ति नाकळतां ।

ऐसिया तुझा पादाब्जगंध । तव पदभजकां मोक्षप्रद ।

लक्ष्मीचें जें स्थान विशद । सज्जनवृंद ज्या वर्णी ।

त्यातें करूनि अवघ्राण । ऐसियातेंही अवगणून।

कोणती वधू असज्ञान । मर्त्यालागून भजतसे ।

अर्थीं अविविक्त दृष्टि जिची । यास्तव मर्त्यां न जाणेचि ।

जेथ संपदा बहु भयाची । तया अन्याची प्रीत तिये ।

यास्तव मरणधर्मिका तेही । पडूनि बहळभवप्रवाहीं ।

सदैव निमग्न दुःखडोहीं । निश्वरनिरता म्हणोनियां ।

अगुणत्वदोष आपणाकडे । बोलिलां तेंही वचन कुडें ।

अचिंत्यानंतगुनपडिपाडें । येर बापुडें कोण तुके ।

-ऍड. देवदत्त परुळेकर

Related Stories

चढ-उताराच्या प्रवासात बाजार घसरला

Patil_p

प्रलयकारी मोसमी पाऊस

Amit Kulkarni

मोरूचे मित्र

Patil_p

ब्रह्मसायुज्य

Patil_p

देहासारखा उपकारी मित्र दुसरा नाही

Patil_p

सलाम तिच्या कर्तृत्वाला

Patil_p
error: Content is protected !!