तरुण भारत

महाराष्ट्रात 21,029 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; 479 मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढतच आहे. मागील 24 तासात 21,029 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 479 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 12 लाख 63 हजार 799 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 33 हजार 866 एवढा आहे. त्यामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.  

बुधवारी दिवसभरात 19,476 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 9 लाख 56 हजार 030 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 लाख 73 हजार 477 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 75.65 % आहे. तर मृत्यू दर 2.68 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 61 लाख 06 हजार 787 नमुन्यांपैकी 12 लाख 63 हजार 799 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 18 लाख 75 हजार 424 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 34 हजार 457 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

पुण्यातील सर्वांना आता ‘या’ वेळेत मिळणार पेट्रोल

pradnya p

पालघर हत्या : लज्जास्पद कृत्यातील आरोपींवर कडक कारवाई करणार : उध्दव ठाकरे

prashant_c

महाराष्ट्रात आजपासून विमानसेवा सुरू

datta jadhav

रत्नागिरीत आणखीन दोघे कोरोना पॉझिटिव्ह

triratna

… आणि राज ठाकरेंनी जिम मालकांना दिला ‘हा’ सल्ला

pradnya p

वाधवान बंधू सीबीआयच्या ताब्यात

prashant_c
error: Content is protected !!