इस्रायलमध्ये बेंजामीन नेतान्याहू सरकारसाठी समस्या उभी राहिली आहे. सरकारने संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी देशाच्या काही हिस्स्यांमध्ये टाळेबंदी लागू केली असली तरीही लोक त्याचे पालन करण्यास तयार नाहीत. इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये लोकांनी टाळेबंदीच्या विरोधात निदर्शने केली आहेत. मार्चपासून जीवनावर अत्यंत प्रतिकूल प्रभाव पडल्याचा आरोप लोकांनी केला आहे. सरकार स्वतःच्या अपयशाचे खापर लोकांवर फोडू पाहत असल्याचे काही सामाजिक संघटनांनी म्हटले आहे. सरकारने शुक्रवारपासून 3 आठवडय़ांची टाळेबंदी जाहीर केली आहे. परंतु याच कालावधीत ज्यूंचे नववर्ष रोश हाशना साजरा केला जात आहे.


previous post
next post