तरुण भारत

सोलापूर : पांडुरंग कारखान्याच्या चेअरमनपदी आमदार प्रशांत परिचारक

श्रीपूर / वार्ताहर

पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनपदी आमदार प्रशांत परिचारक यांची आज निवड करण्यात आली. दिवंगत चेअरमन सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदासाठी आज निवडप्रक्रिया संपन्न झाली.

Advertisements

ज्येष्ठ नेते स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पदाची गुरुवारी सकाळी 11 वाजता निवडप्रक्रिया संपन्न झाली. यावेळी कारखान्याच्या सर्व संचालकांनी तसेच व्हा. चेयरमन वसंतराव देशमुख यांनी आमदार प्रशांत परिचारक यांनीच चेअरमन व्हावे. सुधाकरपंतानंतर कारखान्याची धुरा आ. प्रशांतराव यांनीच सांभाळावी. अशी भावनिक विनवणी केली. त्यानंतर निवड प्रक्रियेतील कायदेशीर बाबी पूर्ण करून चेअरमन पदासाठी आमदार प्रशांत परिचारक यांचे नाव सहाय्यक निबंधक तथा निवडणूक अधिकाऱ्यांकडे निर्देशित करण्यात आले. यानंतर आमदार प्रशांत परिचारक यांची चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झाली.

Related Stories

आयपीएल क्रिकेटचा सट्टा चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

triratna

महर्षी शिंदेंचे अस्पृशता निवारणाचे काम मोलाचे

prashant_c

पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात सोलापूर शिवसेनेची सायकल – बैलगाडी रॅली

triratna

नक्षलवाद्यांशी लढताना पंढरपूरचे पोलीस उपनिरीक्षक गडचिरोलीत शहीद

triratna

सोलापूर : दुकान मालकांची कोरोना चाचणी आदेश रद्द करा

triratna

रोजंदारी कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात सेवा खंडित करू नये

triratna
error: Content is protected !!