तरुण भारत

श्रीकांत चौगुले यांची महाराष्ट्र राज्य अॉडिटर्स असोसिएशनच्या संचालकपदी निवड

खोची/ वार्ताहर


सहकारी लेखापरीक्षक संघ कोल्हापूरचे अध्यक्ष श्रीकांत महादेव चौगुले यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य अॉडिटर्स कौन्सिल अॕण्ड वेल्फेअर असोसिएशनच्या संचालकपदी निवड झाली.या निमित्ताने त्यांना राज्य पातळीवरील एका महत्त्वाच्या पदावर काम करणेची संधी मिळत आहे.

अॉनलाईन वेबिनारच्या माध्यमातून संस्थेचे उद्घाटन अॕड. एस.बी.पाटील,निवृत्त अप्पर आयुक्त तथा सहसचिव स.प.वि.मंत्रालय मुंबई यांच्या हस्ते झाले.संघटनेच्या अध्यक्षपदी रामदास शिर्के (पुणे) तर सेक्रेटरी पदावर उमेश देवकर (नगर) यांची निवड झाली. त्याचप्रमाणे औरंगाबाद- आबासाहेब देशमुख,नाशिक- संदिप नगरकर , सातारा -संजय घोलप,अकोले-बाळासाहेब देशमुख,खंडाळा- दत्तात्रय पोवार यांची संचालक म्हणुन निवड झाली.

यावेळी बोलताना एस.बी. पाटील यांनी अशा संघटनेची गरज अधोरेखीत केली. सहकार खात्याचा एक महत्त्वाचा घटक , किंबहुना एक अविभाज्य भाग असलेला प्रमाणीत लेखापरीक्षक आज अनेक अडचणीतुन जात आहे. त्याला कोणतेही कायदेशीर संरक्षण नाही. घटनादुरुस्तीनंतर त्याच्या जबाबदारीत प्रचंड वाढ झाली असताना फारसे संरक्षण मात्र नाही. अशा परिस्थितीत एकत्र येउन काम करणे व आपले प्रश्न सनदशीर मार्गाने सोडविण्यासाठी अशा संघटनेची गरज आहे.

अध्यक्ष रामदास शिर्के यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,कोणाशीही अयोग्य स्पर्धा न करता आपणांस समन्वयाने काम करावयाचे आहे. लेखापरीक्षकासाठी कायदेशीर सुरक्षा,आरोग्य सुविधा,सहकारी प्रशिक्षण,विमा तसेच अडचणीच्या वेळी आर्थिक व अन्य मदत करुन लेखापरीक्षकांच्या अडचणींचे निराकरण करणेसाठी संघटना सदैव कार्यरत राहील. संघटनेने लॉकडाउनच्या काळात वेबिनारच्या माध्यमातून दर आठवड्यात याप्रमाणे आतापर्यंत २६ प्रशिक्षण कार्यक्रम घेतले आहेत.यामध्ये सहकार खात्यातील अनेक मान्यवरांनी व्याख्याने दिली आहेत. प्रशिक्षण हा सहकारी चळवळीचा आत्मा असुन संघटनेचा तो प्रमुख उद्देश आहे. कायद्यात वेळोवेळी होणारे बदल आत्मसात करुन आपली जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडण्यासाठी लेखापरीक्षक यांनी या संघटनेच्या माध्यमातून कार्यरत रहावे,असेही त्यांनी सांगितले.यावेळी सेक्रेटरी उमेश देवकर यांनीही आपल्या मनोगतात सर्वांनी एकत्र येण्याबाबत आवाहन केले.
श्रीकांत चौगुले यांनी राज्य पातळीवर अशा सक्रीय संघटनेची गरज असुन सर्वांनी एकमताने काम करुन लेखापरीक्षक यांचे अनेक वर्षांपासुन लटकलेल्या प्रश्नांची सोडवणूक करुया,असे मत व्यक्त केले. कार्यक्रमास सहकार खात्याचे निवृत्त अधिकारी,कायदेशीर सल्लागार अॕड. खरात यांचेसह १०० हुन अधिक लेखापरीक्षक उपस्थित होते.

Related Stories

गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचा वाढदिवस उत्साहात

Patil_p

अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करणारा नराधम बाप अटकेत

triratna

कोल्हापूर – वैभववाडी रेल्वेमार्गासंदर्भात लवकरच निर्णय घेवू : रेल्वेमंत्री सुरेश अंगडी यांचे खासदार मंडलिक यांना आश्वासन

triratna

कोल्हापूर : खटांगळेतील एक जण कोरोना पॉझिटिव्ह ; ६४ जण संपर्कात

triratna

खाजगी सावकारीतून मित्रालाच ठार मारण्याची धमकी

triratna

यंदा लग्नग्नाच्या बेडीत अडकणार्या जोडपी सलाईन वर

Patil_p
error: Content is protected !!