तरुण भारत

उत्रे गावात तीन दिवस कडकडीत बंद

उञे /वार्ताहर

उञे (ता.पन्हाळा ) येथे एका दिवसात कोरोनाने मुलगा पाठोपाठ वडीलांचाही धक्कयाने मृत्यू झाल्याने व इतर अन्य दहा जणांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. यामुळे गावात गुरूवार ते शनिवार तीन दिवस कडकडीत बंद पुकारला आहे. गावातील सर्व व्यवहार बंद करून लोकांनी घरी राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गावात शोककळा पसरली आहे.

Advertisements

उत्रे या अडीच हजार लोकवस्तीच्या गावात गेल्या पंधरा दिवसात कोरोनाने शिरकाव केला यात एका एस.टी वाहक असणारे सुरेश पाटील यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला त्याचा धक्काने माजी सरपंच असणारे वडील बळवंत पाटील यांचा ही मृत्यू झाला. मुला पाठोपाठ वडीलांचाही अवघ्या काही तासात मृत्यू झालयाने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले. तर पंधरा दिवसात आठ इतर वृध्दांचेही अचानक निधन झाले. यामुळे गावात शोककळा पसरली आहे. यामुळे दक्षता घेतली असुन तीन दिवस कडकडीत बंद पुकारला आहे. गावात सर्व व्यवहार बंद करून लोकांनी सहकार्य केले.कोरोना दक्षता कमिटीने कमांडो सुरक्षा बोलवून कडकडीत बंद केला आहे. गावात आरोग्य यंत्रणा सोडून सर्व व्यवहार बंद ठेवून दक्षता घेतली आहे.

Related Stories

दक्षिण भारतातील चळवळ मजबूत करा; डॉ. गणेश देवी यांची राजू शेट्टींना विनंती

Abhijeet Shinde

कोल्हापूर : तीन आठवड्यानंतर `गो कोरोना’..!

Abhijeet Shinde

अभ्यासक्रम अपूर्ण असताना परीक्षा घेणार कशी ?

Abhijeet Shinde

कोडोलीत देशी दारू दुकानात बारा हजाराच्या दारूची चोरी

Abhijeet Shinde

खोचीतील पूरग्रस्तांना दोन वर्षानंतरही मदत नाही

Abhijeet Shinde

करवीर तालुक्यात दिवसभरात 27 रुग्णांची भर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!