तरुण भारत

उमर खालिदला 23 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


फेब्रुवारीमध्ये उत्तर-पूर्व दिल्लीत झालेल्या दंगलीत हात असल्याच्या आरोपाप्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी जेएनयूचा माजी विद्यार्थीनेता उमर खालिदला अटक केली आहे. अवैध कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या (युएपीए) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, आज खालिदला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायाधीश अमित रावत यांच्यासमोर हजार केले. यावेळी त्याला 22 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

खालिदविरोधात देशद्रोह, खून, खुनाचा प्रयत्न, धर्माच्या आधारे समाजात द्वेष भडकावणारे आणि दंगल भडकवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान, पोलिसांनी दंगलीशी संबंधित अन्य एका प्रकरणी उमरच्या विरोधात युएपीए अंतर्गत गुन्हा नोंदविला होता. तसेच पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला होता.

Related Stories

वर्षअखेरपर्यंत येणार भारतीय लस

Patil_p

पंजाब सरकारने वाढवला 2 आठवडे लॉकडाऊन

datta jadhav

केरळमध्ये भूस्खलन; 13 जणांचा मृत्यू

datta jadhav

मिजोरममध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

pradnya p

‘बोडोलँड’प्रश्नी शांती करार

Patil_p

पंजाबमध्ये 14 एप्रिलपर्यंत संचारबंदी

Patil_p
error: Content is protected !!