तरुण भारत

जंबो कोविडसेंटरमधून बेपत्ता झालेल्या लेकीसाठी माऊलीचे आमरण उपोषण

ऑनलाईन टीम / पुणे : 


कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या आपल्या 33 वर्षीय लेकीला त्या माऊलीने जंबो कोविड सेंटरमध्ये दाखल केले. ससून रूग्णालयातून याठिकाणी दाखल झालेल्या या रूग्ण महिलेवर उपचार सुरू असल्याचे कोविड सेंटरतर्फे सुरूवातीला सांगण्यात आले. मात्र, बरी झालेल्या आपल्या लेकीला जंबो कोविड सेंटरमधून घरी घेऊन जाण्यासाठी गेलेल्या मातेला, ‘तुमची मुलगी येथे एडमिटच नव्हती’, अशी धक्कादायक माहिती देण्यात आल्याने त्या माऊलीने आता आमरण उपोषणाचा मार्ग निवडला आहे. 

Advertisements

जंबो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेल्या प्रिया गायकवाड या 33 वर्षीय महिलेचा घातपात झाला असण्याची शक्यता व्यक्त करत बेपत्ता महिलेच्या आई रागिणी सुरेंद्र गमरे जंबो कोविड सेंटर येथे आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. या उपोषण आंदोलनाचे आयोजन रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले असून यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्ष नेते राहुल डंबाळे हेदेखील उपोषणाला बसले आहेत.


यावेळी बोलताना प्रिया गायकवाड यांच्या आई रागिणी सुरेंद्र गमरे म्हणाल्या की, माझी मुलगी परत मिळाल्याशिवाय मी हे उपोषण सोडणार नाही. माझी मुलगी मला जीवंतच मिळाली पाहिजे. ससून रूग्णालयातून अँब्यूलन्समधून कोविड सेंटरमध्ये माझी मुलगी दाखल झाली होती. दरम्यानच्या काळात तिच्यावर उपचार सुरू असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. आता मुलीला घरी परत नेण्याची वेळ आली तेव्हा ती कोविड सेंटरमध्ये नसल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात संबंधित सर्व यंत्रणा हात वर करून मोकळ्या झाल्या आहेत. मला माझी मुलगी पाहिजे आहे आणि मला न्याय पाहिजे आहे. 


राहुल डंबाळे म्हणाले की, करोडो रूपये खर्च करून आणि ठिकठिकाणी सीसीटिव्ही लावून उभारण्यात आलेल्या जंबो कोविड सेंटरचा कारभार फारच संतापजनक आहे. अशा प्रकारे याठिकाणाहून एखादी व्यक्ती बेपत्ता होते, हा यंत्रणेतील दोष असून संबंधित प्रशासकीय यंत्रणेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच पालकमंत्री, आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री या सगळ्यांनी या प्रकारात लक्ष घालून या माऊलीला न्याय द्यावा, अशी आमची मागणी आहे.

Related Stories

१६ कोटीच्या इंजेक्शननंतरही पुण्यातील चिमुकल्या वेदिकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

‘या’ कारणासाठी इस्त्रायलनं मराठीत ट्विट करत मानले मुख्यमंत्री ठाकरेंचे आभार

Abhijeet Shinde

”अनिल देशमुखांवरील कारवाई कोर्टाच्या आदेशानुसार, याचा राजकीय अन्वयार्थ काढण्याची गरज नाही”

Abhijeet Shinde

महाराष्ट्र : कोरोनाबाधितांची संख्या 16 लाख पार

Rohan_P

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोविड पॉझिटिव्ह

Sumit Tambekar

सीमाबांधवांचा कोल्हापुरात एल्गार !

Abhijeet Shinde
error: Content is protected !!