तरुण भारत

चिपळुणात कृषी विधेयकावरून राष्ट्रवादी युवकचे आंदोलन

प्रतिनिधी / चिपळूण

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकरी वर्गावर मोठा अन्याय होणार असल्याने त्याचा निषेध करत गुरूवारी चिपळूण येथे राष्ठ्रवादी युवक तर्फे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्याकडे निवेदन सादर केले. कृषी विधेयकामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कार्यरत असणारे अनेक अधिकारी, कर्मचारी यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच बाजार समित्या बंद झाल्यास शासनाच्या धोरणानुसार शेतीमालाचा हमीभाव खाजगी कंपनी स्वतच्या फायद्यानुसार शेतकयांना मोबदला देईल. त्यामुळे विविध समस्या निर्माण होणार असल्याने राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा गुरूवारी आंदोलनावेळी निषेध व्यक्त करत तसे निवेदन प्रांताधिकार्‍यांना सादर केले.

यावेळी युवकचे प्रदेश सरचिटणीस राकेश चाळके, जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, बाबू साळवी, शिरीष काटकर, रमेश राणे, जागृती शिंदे, दीपिका कोतवडेकर, दिशा दाभोळकर, शमीना परकार, दशरथ दाभोळकर, वात्सल्य शिंदे, सिद्धेश लाड, समीर काझी, खालीद दाभोळकर, किसन चिपळूणकर, अभिजित खताते, रियाझ खेडकर, संदेश गोरीवले, खालील पटाईत, रोहन इंगावले, मनोज जाधव, सचिन पाटेकर, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

खेडमध्ये सात टँकरद्वारे 19 गावे 36 वाडय़ांना पाणी पुरवठा

Patil_p

रत्नागिरी : भाजप प्रदेश धनगर समाज प्रमुखपदी अँड. मिलींद जाडकर

triratna

पिसाळलेल्या कोह्याचा सातजणांना चावा

Patil_p

मुंबई-सावंतवाडी स्वतंत्र ‘एक्प्रेस वे’

Patil_p

खेडमध्ये आणखी एका वीटभट्टी कामगाराचा मृत्यू

Patil_p

रत्नागिरी जिल्ह्यातील ३४४ रिपोर्ट निगेटिव्ह

triratna
error: Content is protected !!