तरुण भारत

महाराष्ट्र : मागील 24 तासात 161 पोलिसांना कोरोनाची बाधा

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 161 पोलिसांना कोरोनाची लागण झाली तर एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 21 हजार 988 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 235 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 21,988 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 2398 पोलीस अधिकारी आणि 19,590 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 18 हजार 372 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 1954 पोलीस अधिकारी आणि 16,418 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

  • 3381 ॲक्टिव्ह रुग्ण 


सद्यस्थितीत राज्यात 3381 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 421 पोलीस अधिकारी आणि 2960 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 235 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 23 पोलीस ऑफिसर आणि 212 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

Related Stories

शेतकऱयाना हेक्टरी 50 ते 60 लाख रुपये दर मिळावा

Patil_p

कोरोनाचा कहर : मध्य प्रदेशातील अनेक शहरात लॉकडाऊन!

Rohan_P

राजस्थानमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 55 हजार पार

Rohan_P

कर्नाटक : एसएसएलसी परीक्षा पुढे ढकलल्या

triratna

चीनने भारताचे 200 जवान मारले; काँग्रेस नगरसेवकाची ऑडिओ क्लीप व्हायरल

datta jadhav

कामगारांअभावी घरपोचला बसतोय खो

Patil_p
error: Content is protected !!