तरुण भारत

डिव्हिडंड मंजूरीचे अधिकार संचालक मंडळाला द्या : आ. ऋतुराज पाटील

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या सभा झाल्या नसल्याने डिव्हिडंड आणि रिबेट रकमेला मंजुरी देताना तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. याचा विचार करून यंदा ही मंजुरी देण्याचे अधिकार त्या त्या संस्थेच्या संचालक मंडळाला द्यावेत. दसरा-दिवाळीच्या तोंडावर शेतकरी सभासदांना वेळेवर ही रक्कम मिळावी, यासाठी याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.

Advertisements

याबाबतचे निवेदन आ. पाटील यांनी सहकारमंत्री यांना पाठवून त्यांच्याशी फोनवर चर्चा केली. या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेऊन शेतकरी सभासदांना दिलासा देऊ, असे आश्वासन ना. बाळासाहेब पाटील यांनी आ. ऋतुराज पाटील यांना यावेळी दिले.

याबाबत दिलेल्या निवेदनात आ. पाटील यांनी म्हटले आहे की, कोविडच्या संकटाचा परिणाम अनेक घटकांवर झाला आहे. कोविडमुळे महाराष्ट्र राज्यातील अनेक सहकारी संस्थांच्या संचालक मंडळांना शासनाने मुदतवाढ दिली आहे. सेवा संस्था, दूध संस्था, पाणीपुरवठा संस्था यासारख्या सर्व सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी जुलै, ऑगस्ट महिन्यात होतात. या सभेत संस्थेने सभासदांना प्रस्तावित केलेला वार्षिक लाभांश (डिव्हिडंड) व रिबेटचा विषय मंजुर करुन घेतला जातो. सदरचा लाभांश हा ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये सभासदांना मिळत असल्याने सभासदांची आर्थिक निकड पूर्ण होवून या कालावधीमधील सणांना त्याचा वापर केला जात असतो.

सध्या कोविडमुळे शासनाने दि. 23 जुलै 2020 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यास्तव अनेक संस्थांच्या सभा झालेल्या नाहीत. त्यामुळे लाभांश व रिबेट ला मंजुरी घेता आलेली नाही. सभासदांना दसरा, दिवाळी च्या पार्श्वभूमीवर ही रक्कम मिळणे अडचणीचे झाले आहे. अगोदर कोविडमुळे अर्थचक्र कोलमडून गेलेल्या सभासदांना लाभांश व रिबेट वेळेत मिळाला नाही, तर त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
या सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार होवून सभासदांना दरवर्षी देण्यात येणारा लाभांश व रिबेट रकमेची मंजूरी संचालक मंडळाच्या मासिक सभेत घ्यावी, याकरीता संस्थेला परवानगी देणेबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

कोल्हापूर : सीपीआरमधील ‘पीपीई’ कीटवर बुरशी..!

Abhijeet Shinde

सवदी यांचे वक्तव्य कर्नाटकातील जनतेला खुश करण्यासाठी : उपमुख्यमंत्री अजित पवार

Abhijeet Shinde

गणपतराव पाटील यांचे जमीन पुनर्वसनाचे काम पाहून समाधान वाटले : जयंत पाटील

Abhijeet Shinde

दलित समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन

Patil_p

शरद पवार 28 फेब्रुवारीला कोल्हापूर दौऱ्यावर

Abhijeet Shinde

फक्त दहा रुपयात औषधोपचार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!