तरुण भारत

तुंगतच्या सर्व्हेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

पंढरपूर / वार्ताहर

कोरोना रोगावरती नियंत्रण ठेवण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आली आहे. गाव पातळीवर कामकाज कसे चालू आहे यासंदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तुंगत ता. पंढरपूर येथे गुरुवारी भेट दिली. प्रत्यक्षात कुटुंबाला भेट देऊन झालेल्या सर्व्हेची पाहणी करीत कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृती बद्दल विचारपूस केली.
जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांशी संवाद साधून कोरोना आजाराबद्दल मार्गदर्शन केले.

या मोहिमेअंतर्गत सरपंच, सर्व सदस्य, ग्रामस्थ, स्वयंसेवक तसेच शासकीय विविध विभागाचे कर्मचारी यांनी आरोग्य विभागाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले. कुटुंब सर्वेक्षण बाबत सर्वांना सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. कोरोना रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून लोकांनी मास्क वापरणे, हाताची स्वच्छता राखणे, याबाबत जनजागृती करून अंमलबजावणी करणेबाबत सांगितले. तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया तसेच संशयित लक्षणे असणाऱ्या व्यक्ती यांचे स्वॅब तपासणी न भिता करून घेण्याबाबत सूचित केले. याप्रसंगी स्वतः माझे कुटुंब माझी जबाबदारी याबाबत ग्रामस्थांसोबत स्वतः वाचन करून प्रतिज्ञा घेतली व सर्वांना त्या प्रतिज्ञेचे महत्त्व समजावून सांगितले.

यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार सौ. वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, सरपंच आगतराव रणदिवे, उपसरपंच वैशाली लामकाने, पोलीस पाटील देठे, ग्रा. स.वामन वनसाळे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत नवत्रे, डॉ. रणजीत रेपाळ, आरोग्य सहाय्यक अनिल यलमार, आरोग्य सेवक श्याम नारनवरे, ग्रामसेवक चेंडगे एस एम, तलाठी शिंदे, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

नितीन राऊत, गजानन किर्तीकर, जितेंद्र आव्हाड यांना जाधवर युवा संसदेचे पुरस्कार

prashant_c

पुण्यात डीएसके ठेवीदाराची गळफास घेऊन आत्महत्या

prashant_c

स्वराविष्कारात रंगला ‘कै. पं. शंकर विष्णू कान्हेरे समारोह’

prashant_c

‘हायपरलूप’ आपल्याकडे नको : अजित पवार

prashant_c

सोलापूर शहराला चार तर हद्दवाढ भागाला पाच दिवसाआड पाणीपुरवठा

Shankar_P

…हे तर नाराजांचे सरकार : राम शिंदे

prashant_c
error: Content is protected !!