तरुण भारत

सातारा : वनविभागाचे चार कर्मचारी अखेर निलंबित

संभाजी चव्हाण / नागठाणे

पिरेवाडी (ता.सातारा) येथील ओंकार शामराव शिंदे या युवकाला शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत पंचवीस हजार रुपये घेतल्याप्रकरणी प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेले वनविभागाचे परळी वनपाल योगेश पुनाजी गावित,कुसवडे वनरक्षक महेश साहेबराव सोनावले,पळसावडे वनरक्षक रणजीत व्यंकटराव काकडे व ठोसेघर वनरक्षक किशोर ज्ञानदेव ढाणे या चौघांना शासन सेवेतून निलंबित केल्याची माहिती उपवनसंरक्षक डॉ.भारतसिंह हाडा यांनी दिली. या चारही वनकर्मचार्यांविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असून अद्याप ते पोलिसांना गुंगारा देत आहेत.

३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी शिवारातील पिकांचे माकडांपासून रक्षण करण्यासाठी गेलेल्या ओंकार शिंदे या युवकाला वनविभागाच्या चार कर्मचाऱ्यांनी पकडून त्याला शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली.यावेळी त्याला मारहाण करून त्याच्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेऊन हाताचे ठसेही घेतले.व त्याच्याकडे एक लाख रुपयांची मागणी करत त्याच्या कुटुंबियांकडून पंचवीस हजार रुपये उकळले होते.

५ सप्टेंबरला या घटनेची फिर्याद ओंकार शिंदे याने बोरगाव पोलीस ठाण्यात दिली होती.तसेच याची तक्रार त्याने उपवनसंरक्षक डॉ.भारतसिंह हाडा यांच्याकडेही केली होती.पोलिसांनी वनपाल योगेश गावित,वनसंरक्षक महेश सोनवले,रणजित काकडे व किशोर ढाणे यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.तेव्हापासून हे चारही वनकर्मचारी पोलिसांना गुंगारा देत आहेत.या संपूर्ण प्रकरणाचा सुरवातीपासून ‘तरुण भारत’ ने पाठपुरावा केला होता. वनपाल योगेश गावित व वनसंरक्षक महेश सोनवले यांनी सातारा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीनही नुकताच फेटाळला होता.

दरम्यान, डॉ.भारतसिंह हाडा यांनी या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्यास वनक्षेत्रपाल,सातारा व सहायक वनसंरक्षक (वनीकरण व कॅंप),सातारा यांना सांगितले होते.या प्राथमिक चौकशीत वनपाल योगेश गावित,वनरक्षक महेश सोनावले, रणजित काकडे व किशोर ढाणे हे दोषी आढळल्याने त्यांना २४ सप्टेंबरपासून शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

Related Stories

राजधानी साताऱयात दसरा उत्साहात

Patil_p

सातारा : पंढरपूरच्या आंदोलनसाठी जिल्ह्यातील वंचितचे कार्यकर्ते रवाना

triratna

सातारा जिल्ह्यात 226 जणांना डिस्चार्ज, 46 नवे रुग्ण

Shankar_P

माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रम शहरासह वाडी- वस्ती गावपातळीपर्यंत पोहचणार

Patil_p

राज्यात सातारा जिल्हा वाहतूक पोलीस नंबर वन

Shankar_P

दलित महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश चव्हाण

Patil_p
error: Content is protected !!