तरुण भारत

गांधीनगरमध्ये बेकायदेशीररित्या ठेवी जमा करणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

उचगांव / वार्ताहर

बेकायदेशीररित्या ठेव जमा करून ती दहा टक्के व्याजाने भिशीतील सभासदांना वाटप करणाऱ्या गांधीनगर बाजारपेठेतील गडमुडशिंगी हद्दीतील गुडलक स्टोअर्सचा मालक प्रकाश रमेश वाधवाणी (वय 39, रा. वृषाली हॉटेल शेजारी, सोना पार्क, कोल्हापूर) याला छापा टाकून अटक केली आहे. त्याच्याकडून चार लाख 80 हजार 930 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. हा छापा करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने टाकण्यात आला.

बुधवारी (दि. 23) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास गांधीनगर बाजारपेठेतील गडमुडशिंगी हद्दीमधील प्रकाश रमेश वाधवाणी याच्या गुडलक स्टोअर्स या दुकानावर करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामधील पोलीस उपनिरीक्षक सुनील विलास माळगे यांनी छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत छापा सत्र सुरू राहिले. त्यात सांकेतिक पद्धतीने लिहिलेल्या हिशेब नोंदवह्या, करार पत्रे, मिळकतीचे उतारे, दस्तऐवज, धनादेश व 4 लाख 80 हजार 930 रुपयांची रक्कम मिळून आली. रोख रकमेसह सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला व प्रकाश वाधवानी याला अटक करण्यात आली. गुरुवारी (दि.२४) त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली. याबाबतची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक सुनील माळगे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली.

Related Stories

आई अंबाबाई, मुश्रीफ साहेबांना लवकर बरं कर..!(व्हिडिओ)

triratna

कोल्हापूर : कतृत्ववान महिलांचे संघटन करणार

triratna

कोल्हापूर : गांधीनगर परिसरातील कोरोना रुग्णसंख्या 286

Shankar_P

हातकणंगले पोलिसांच्या सतर्कतेमुळ अपहरण झालेल्या दोन मुलांची सुटका

triratna

देशातील पहिले ऑनलाईन कुस्ती मैदान शाहूपुरी तालमीच्या पै .संतोष दोरवडने मारले

Shankar_P

सातारा : कास धरणाचे रखडलेले काम पुर्ण होण्याचा मार्ग मोकळा

triratna
error: Content is protected !!