तरुण भारत

शेतकऱयांचा उद्या देशव्यापी संप; किसान संघर्ष समितीचे समन्वयक राजू शेट्टी यांचे आवाहन

प्रतिनिधी / कोल्हापूर

सुधारीत शेतकरी विधेकाच्या विरोधात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने शुक्रवारी 25 सप्टेंबरला देशव्यापी संप करण्यात येणार आहे. या संपामध्ये कोल्हापुराती विविध शेतकरी संघटना, डावी आघाडी, कामगार संघटना सहभागी होणार आहेत. राज्यातील शेतकऱयांनी केंद्र सरकारने शेतकरी कायदा संमत केल्याच्या विरोधात कडकडीत बंद पाळावा, असे आवाहन अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे समन्वयक राजू शेट्टी यांनी केले आहे.

मोदी सरकारने राज्यसभेत तीन शेतकरी विधेयकांना मंजुरी दिली आहे. या विधेयकाचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. देश पातळीवरील अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने या विधेयकांस तीव्र विरोध केला आहे. यातून शेतकऱयांना कोणताच लाभ होणार नसल्याचे जाहीर केले आहे. सरकार हमीभावातून शेतकऱयांना बाजूला सारत आहेत. या शेतकरी धोरणाविरोधात देशभरातील शेतकरी संघटनामध्ये तीव्र अंसतोष पसरलेला आहे. या विधेयकाच्या विरोधात 25 सप्टेंबर रोजी सर्व पक्षीय भारत बंद पुकारला आहे. राज्यातील सर्व शेतकऱयांनी या शेतकरी विरोधी विधेयकाचा विरोध करण्यासाठी बंदमध्ये सामील व्हावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे. त्याच बरोबर अन्य संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय, बिंदू चौक, दसरा चौक येथे निदर्शने करण्यात येणार आहेत.

—-

स्वाभिमानीच्यावतीने विधेयकाची होळी

स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी विरोधी विधेयकाची होळी करुन केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यात येणार आहे. स्वाभिमानीचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयासमोर हे आंदोलन करतील.

राजू शेट्टी

संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Related Stories

अमेरिकेत 45 टन वजनाची 25 फुटी हनुमानाची मूर्ती विराजमान

datta jadhav

पुलाची शिरोली परिसरात डेंग्यूचा फैलाव वाढला

triratna

अमेरिकाही घालणार चिनी अ‍ॅप्सवर बंदी

datta jadhav

कोल्हापूर : बांबवडेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन तणाव

Shankar_P

‘त्या ‘ रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल महत्त्वाचे ठरणार

triratna

ऑगस्टपर्यंत संसर्गाचे प्रमाण शून्यावर : डॉ. रोहिदास बोरसे

prashant_c
error: Content is protected !!