तरुण भारत

सातारा जिल्ह्यातील कोरानामुक्त 1003 नागरिकांना डिस्चार्ज

सातारा / प्रतिनिधी

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 1003 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 906 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

906 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 47,उपजिल्हा रुग्णालय कराड 12, उपजिल्हा रुग्णालय फलटण 70, कोरेगाव 69, वाई 88, खंडाळा 68, रायगांव 120, पानमळेवाडी 158, मायणी 30, महाबळेश्वर 55, दहिवडी 20, खावली 20, तळमावले 37 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 132 असे एकूण 906 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने — 118353
एकूण बाधित — 33072
घरी सोडण्यात आलेले — 23215
मृत्यू — 1000
उपचारार्थ रुग्ण — 8857

Related Stories

रयत शिक्षण संस्थेच्या समोर अभाविपने केली निदर्शने

Patil_p

गटर खोदून दीड आठवडा तसेच काम

Patil_p

सातारा : कोयना खोऱ्यात 2.4 रिस्टर स्केल भूकंपाचा धक्का

triratna

सातारा : ग्रामसेवकास धक्काबुक्की केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

triratna

ऍट्रासिटीची भीती दाखवून उकळली आठ लाखांची खंडणी

Patil_p

सातारा : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम लोकचळवळ व्हावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

triratna
error: Content is protected !!