तरुण भारत

उपायुक्त पांडे यांच्या नियुक्ती बाबत योग्य तो निर्णय घेणार : मंत्री एकनाथ शिंदे

सोलापूर : प्रतिनिधी

लेखा विभागात कार्यरत असलेल्या धनराज पांडे यांची शासनाकडून सोलापूर महानगरपालिकेत उपायुक्त या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली आहे. सदरच्या चुकिच्या झालेल्या नियुक्ती बाबत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी ‘शासन निर्णयानुसार उपायुक्त पांडे यांच्या नियुक्ती बाबत योग्य तो निर्णय घेणार असल्याचे ‘तरुण भारत संवाद’ला सांगितले.

उपायुक्त पांडे यांच्या नियुक्ती बाबत हरकत घेत उपमहापौर राजेश काळे यांनी प्रश्न उपस्थीत केला होता. याबाबत त्यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे, धनराज पांडे हे लेखा विभागात कार्यरत असलेले अधिकारी आहेत. त्यांची नियुक्ती ही फक्त मुख्यलेखापरीक्षक अथवा अन्य लेखा विभागात होणे अपेक्षित आहे. राज्यातील महानगरपालिकांचे वर्गीकरण आणि त्या आधारे महानगरपालिका सेवांची ३ सेवेत विभागणी करुन ३८ अधिकाऱ्यांच्या पदांसाठी आकृतीबंध निश्चित करणेकामी शासनाकडून ४ मे २००६ अन्वये शासन निर्णय शासन (संकीर्ण-1005/वर्गीकरण/प्र.क्र.379/05/नवि-24) पारीत केला आहे. तसेच सदर शासन निर्णयामध्ये प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची तांत्रिक व लेखा सेवेतील पदावर किंवा तांत्रिक व लेखा सेवेतील अधिकाऱ्यांची प्रशासकिय सेवेतील पदांवर बदलीने प्रतिनियुक्तीने नेमणूक करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. असे असताना लेखा विभागातील अधिकारी धनराज पांडे यांची प्रशासकिय उपायुक्त या पदावर नियुक्ती केली आहे. त्यामूळे उपायुक्त पांडे यांची चुकिच्या पध्दतीने केलेली नियुक्ती रद्द करुन त्यांना पूर्ववत शासनाकडे नियुक्त करण्यात यावे. याबाबत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन निर्णयानुसार लवकरच योग्य तो निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

Related Stories

सोलापूर शहरातील दुकाने रात्री 9 पर्यंत सुरु, तर सिनेमागृहे बंदच

Shankar_P

निजामुद्दीन येथील त्या अकरा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह – जिल्हाधिकारी

triratna

सोलापूर : खासदार ओमराजे यांचा बार्शीतील सुर्डी गाव दत्तकचा प्रस्ताव

triratna

सोलापूर : पंढरपुर शहर परिसरात झाली अतिवृष्टी

triratna

कर्जाला कंटाळून व्यापार्‍याची आत्महत्या

triratna

आपण सगळेच दहशतवादी!

prashant_c
error: Content is protected !!