भारतीय क्रिकेट संघातील युवा फलंदाज व सध्या आयपीएल प्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत असलेला शुभमन गिल महान खेळाडू सचिन तेंडुलकरची कन्या सारा हिच्याशी असलेल्या मैत्रीबद्दल ठळक चर्चेत आहे. सोशल मीडियावर जे काही चालले आहे, त्यावरुन या उभयतांची मैत्री आणखी प्रकाशझोतात आली आहे. अलीकडेच शुभमन गिल व सारा तेंडुलकर या दोघांनीही आपल्या सोशल अकाऊंटवरुन समसमान छायाचित्रे समसमान ओळींसह पोस्ट केले होते. साराने नंतर आपले एक छायाचित्र ‘आय स्पाय’ असे लिहित शेअर केले आणि शुभमन गिलनेही तेच नव्या इमोजीसह आपल्या सोशल अकाऊंटवरही झळकावले. चाहत्यांना याचा सुगावा लागला आणि या उभयतांचे डेटिंग सुरु असल्याची अफवाही वाऱयाच्या वेगाने पसरत गेली. त्यातच साराने इन्स्टाग्रामवर बुधवारी एक स्टोरी शेअर या चर्चेला आणखी उत आणण्याची जबाबदारी इमानइतबारे पार पाडली. मुंबई इंडियन्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात यंदाच्या हंगामातील पाचवा सामना खेळवला जाण्यापूर्वी साराने एक क्लिप पोस्ट केली, ज्यात शुभमन गिल हा सुर्यकुमार यादवचा एक फटका अडवण्यासाठी डाईव्ह मारत असल्याचे चित्रित केले गेले. सध्या ती क्लिप सोशल मीडियावर नाही. पण, अनेक चाहत्यांनी तोवर ती क्लिप आपल्याकडे सेव्ह केली होती आणि आता ती व्हायरल होत आहे. साराने त्या क्लिपवर ह्रदयाच्या आकाराचे इमोजी वापरले आहे हे विशेष!


previous post