तरुण भारत

फ्लिपकार्टची मॅक्स फॅशनशी भागीदारी

नवी दिल्ली : येणाऱया उत्सवी काळात होणारी वाढती खरेदी व मागणी लक्षात घेऊन फ्लिपकार्टने मॅक्स फॅशन या ब्रँडशी भागीदारी करण्याचे निश्चित केले आहे. फॅशन गटातील उत्पादनांच्या विक्रीसाठी ही भागीदारी केली असल्याचे समजते.  येणाऱया उत्सवी काळात कपडय़ांची खरेदी वाढणार असल्याने ही बाजारपेठ काबीज करण्यासाठी फ्लिपकार्टने मॅक्स फॅशनला सोबत घेतलं आहे. फॅशनअंतर्गत 13 हजार शैलीची उत्पादने फ्लिपकार्ट सादर करणार असून त्यांची किंमत 1 हजार रुपयांच्या आत असणार आहे. मॅक्स फॅशनची 130 शहरात 340 हून अधिक स्टोअर्स आहेत.

याअंतर्गत कंपनी 100 दशलक्ष कपडे विक्री करते आहे. हीच बाब हेरून फ्लिपकार्टने ही भागीदारी करण्याचे निश्चित केले आहे. फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनच्या विक्री प्लॅटफॉर्मवरही यांचे कपडे विक्रीला उपलब्ध आहेत.

Advertisements

Related Stories

टेक्स्टाईल उद्योगाची स्थिती सुधारण्याचे संकेत

Patil_p

‘ज्युबिलंट फूड’ ला कोरोनाचा तडाखा तडाखा स्टोअर्स

Omkar B

हॉनरचा गेमिंग लॅपटॉप लवकरच बाजारात

Patil_p

RBI च्या घोषणेनंतर शेअर बाजारात उसळी

datta jadhav

एलईडी दिवे, एसी उत्पादनासाठी सरकार देणार प्रोत्साहन

Patil_p

फास्टॅगमार्फत रोज 1 कोटीची वसुली

Patil_p
error: Content is protected !!