तरुण भारत

कोरोनामुळे जगभरातील 50 कोटी लोक बेरोजगार

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

कोरोना महामारीमुळे जगभरातील 50 कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. आंतरराष्ट्रीय श्रम संस्थेच्या (ILO) च्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. 

ILO च्या अहवालात म्हटले आहे की, जगभरातील जवळपास 200 हून अधिक देशांना कोरोनाचा फटका बसला आहे. अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. त्यामुळे जगभरातील 50 कोटी लोकांना नोकरी गमावण्याची वेळ आली. विकसनशील देशातही आर्थिक संकटापेक्षा नोकरी जाण्याचे संकट मोठे आहे. विकसनशील देशातील कामगारांच्या उत्पन्नात 15 टक्के घट झाली आहे.

कोरोनामुळे अनेक देशांच्या आर्थिक, सामाजिक घटकांवर परिमाण झाला आहे. सर्वच देश कोरोनाशी दोन हात करून लढा देत आहेत. आर्थिक संकटाचा सामना करत असताना 2020 वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत जागतिक पातळीवर श्रमिकांचे उत्पन्न 10.7 टक्क्यांनी घसरून 3.5 लाख कोटी डॉलरवर आले आहे.

Related Stories

पुतीनविरोधी नवाल्नी यांना अडीच वर्षांची शिक्षा

Amit Kulkarni

मेक्सिकोत कोरोनाने घेतले 1.71 लाख बळी

datta jadhav

328 दिवसांनी ख्रिस्तिना परतली पृथ्वीवर

Patil_p

अमेरिकेचे संरक्षण मंत्री भारत दौऱ्यावर

datta jadhav

ट्रम्प यांच्याकडून कोरोना मदत निधी विधेयकावर स्वाक्षरी

datta jadhav

नवाज शरीफ भारताचे एजंट : शेख रशीद

datta jadhav
error: Content is protected !!