तरुण भारत

विहिरीत पडलेल्या बिबटय़ाला जीवदान

चरवेलीत ग्रामस्थांसह वनविभागाने केली सुखरूप सुटका

प्रतिनिधी/ रत्नागिरी

Advertisements

जंगलातील बिबटय़ांचा वावर अलिकडे लोकवस्तीच्या शेजारी वाढल्याने लोकांकडून सावधानता बाळगली जात आहे. मुंबई-गोवा महामार्गानजीक रत्नागिरी तालुक्यातील चरवेली येथे एका विहिरीत बिबटय़ा पडल्याची घटना गुरूवारी निदर्शनास आली. ग्रामस्थांच्या सहकार्याने वनखात्याने तातडीने त्या ठिकाणी धाव घेऊन विहिरीत पडलेल्या बिबटय़ाला अर्ध्या तासातच जेरबंद करण्याची कामगिरी केली

  जिल्हाभरात आज विविध भागात बिबटय़ाचा वावर वाढलेला आहे. काही ठिकाणी लोकांवर, पाळीव जनावरांवर या बिबटय़ांकडून हल्ले होण्याच्या घटना घडल्या व घडत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये बिबटय़ाच्या दहशतीचे वातावरण आहे. रत्नागिरी तालुक्यातील पावस-पूर्णगड मार्गावरील मेर्वी येथे काही माणसांवर हल्लाही केला होता. त्या ठिकाणी हल्लेखोर बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी वनविभाग जंगजंग पछाडत आहे. सर्वतोपरी उपाययोजना त्या ठिकाणी आखण्यात आल्या आहेत. अनेकदा जंगल भागात वास्तव्य असलेल्या बिबटय़ांचा वावर मनुष्यवस्तीजवळ होताना दिसत आहे. भक्ष्याच्या शोधात वावरताना हे बिबटे लोकवस्तीतील विहिरीत पडण्याच्या घटना वारंवार होत आहेत. रत्नागिरी तालुक्यातील चरवेली येथे असाच एक बिबटय़ा विहिरीत पडल्याचे आढळून आले. गुरूवारी सकाळी राजेंद्र लक्ष्मण कुरतडकर यांच्या विहिरीत बिबटय़ा पडल्याचे निदर्शनास आले. याविषयीची तत्काळ खबर वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

  बिबटय़ा विहिरीतील पाण्यात तरंगत होता. त्यामुळे त्याला सुखरूप बाहेर काढणे गरजेचे होते. बिबटय़ाला बाहेर काढण्यासाठी वेळ लागेल, अशी शक्यता वनविभागाला वाटत होती. ग्रामस्थांच्या सहकार्याने वनविभागाच्या पथकामार्फत बिबटय़ाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी पिंजरा विहिरीत टाकल्यावर अर्ध्या तासात बिबटय़ा पिंजऱयात जाऊन बसला. बिबटय़ा लगेचच पिंजऱयात जेरबंद झाल्याने साऱयांनीच सुटकेचा निःश्वास टाकला. पकडलेला बिबटय़ा मादी जातीचा वय 1-2 वर्ष, लांबी -155, तर उंची -48सेमी इतकी होती. विभागीय वन अधिकारी दि. पो. खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड, वनपाल पाली जी. पी कांबळे, वनपाल देवरुखचे सुरेश उपरे, वनरक्षक न्हानू गावडे, संजय रणधीर यांनी बिबटय़ास सुखरूप विहिरीतून काढून पशु वैद्यकीय अधिकारी, रत्नागिरी यांच्याकडून तपासून घेऊन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Related Stories

खेर्डीतील ‘स्वामी समर्थ’ मार्केटिंग कंपनीच्या संचालकाला अटक

Patil_p

दापोलीतील तीन गावांतील ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

Patil_p

पिंपळी कॅनालमध्ये पोहण्यास गेलेला तरूण बुडाला!

Patil_p

संगमेश्वरच्या व्यापाऱयांसाठी भाजपचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार मैदानात

Patil_p

संगमेश्वर : माय-लेकरांची पंधरा वर्षांनंतर भेट !

triratna

आंबा घाटातून वाहतूक बंदच

Patil_p
error: Content is protected !!