तरुण भारत

अजित पवारांकडून पुन्हा एकदा भल्या पहाटे पुणे मेट्रो कामाची पाहणी

ऑनलाईन टीम / पुणे :


महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे सहा वाजता  पुणे स्टेशन येथे जावून प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या.

Advertisements


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे स्टेशन, व्हील पार्क डेपो ( वनाज), शिवाजीनगर कृषी महाविद्यालय येथे पाहणी करून मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या सुरू असलेल्या कामाबाबत सविस्तर माहीती दिली. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर येथे मॉडेल ट्रेनने प्रवास केला. शिवाजीनगर येथे बोगदा काम, व्हील पार्क येथील कचरा डेपोचे अत्याधुनिक मेट्रो डेपोमध्ये रूपांतर करण्यात आले आहे, येथील कामाचीही उपमुख्यमंत्री पवार यांनी पाहणी केली. मेट्रोच्या रेणू गेरा यांनी या मेट्रो डेपो उभारणीबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

फडणवीसांनी पोलिसांवर दबाव टाकला; दिलीप वळसे-पाटील यांनी दिले कारवाईचे संकेत

Abhijeet Shinde

कोलंबिया : विटंबनेनंतर कोलंबसचा पुतळा भांडारगृहात हलविला

datta jadhav

एमएमआरडीए कडून एक हजार खाटांचे रुग्णालय 

Rohan_P

कर्नाटकात लसीकरणाचा नवा विक्रम

Abhijeet Shinde

परिस्थिती हाताबाहेर, काबुल विमानतळावर लाखोंची गर्दी

datta jadhav

एमडीएचचे मालक धर्मपाल गुलाटी यांचे निधन

Rohan_P
error: Content is protected !!