तरुण भारत

जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांनी पार 68 हजारांचा आकडा

ऑनलाईन टीम / जम्मू : 


जम्मू काश्मीरमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने फैलावत आहे. मागील 24 तासात 1104 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 22 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 68 हजार 614 वर पोहोचली आहे.  

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, काल मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 624 आणि काश्मीर मधील 480 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 19 हजार 415 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 11,194 आणि काश्मीरमधील 8,257 जण आहेत. 

  • 48,079 रुग्ण कोरोनामुक्त 


त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आज 1549 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 48,079 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 13,995 रुग्ण जम्मूतील तर 34,084 जण काश्मीरमधील आहेत. 

  • 1084 जणांचा मृत्यू 


तर आतापर्यंत 1084 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 283 जण तर काश्मीरमधील 801 जणांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यात 15 हजार 800 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 19 हजार 451 लोक हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षात आहेत. 

Related Stories

टूथब्रश बांबूचा, चहाचा कपही बांबूचा

Patil_p

”नागरिकांचा जीव जात असताना पंतप्रधान मात्र टॅक्स वसूलीत मग्न”

Abhijeet Shinde

पौर्णिमा तिवारी यांची इंटरनेट भरारी

Patil_p

देवेंद्र सिंगने ‘शांत’ बसावे, यासाठीच एनआयएकडे तपास : राहुल गांधी

prashant_c

लसीसाठी काही आठवडय़ांचीच प्रतीक्षा

Patil_p

स्मॅश 2000 प्लस ड्रोन तंत्रज्ञान मिळणार

Omkar B
error: Content is protected !!