तरुण भारत

घोषणाबाजी करून सरकारचा केला निषेध उपजिल्हाधिकाऱयांना निवेदन सादर

वाळपई / प्रतिनिधी

गुळेली याठिकाणी उभारण्यात येणार असलेल्या आयआयटी प्रकल्पाच्या जमीन आरेखन कामाला सुरुवात करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज आयआयटी विरोधकांनी वाळपईच्या शहरांमध्ये घोषणा देत या प्रकल्पाचा तीव्र स्वरूपाचा विरोध केला. तत्पूर्वी त्यांनी तालुक्मयाचे उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांना निवेदन सादर करून डिमार्केशनचे काम त्वरित बंद करावे अशा प्रकारची जोरदार मागणी केली. त्यानंतर वाळपई स्तंभ परिसरात छोटेखानी सभा घेऊन सरकार मनमानीपणा करीत असल्याचा आरोप करून सदर काम त्वरित बंद करण्याची आग्रही मागणी केली आहे.

Advertisements

 याबाबतची माहिती अशी की या गुळेली याठिकाणी उभारण्यात येणार असलेल्या आयआयटी प्रकल्पाच्या जमिनीचे सीमांकन सरकारने सुरू केली आहे. जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार सदर कामाला प्रारंभ करण्यात आला असून बुधवारी पोलिस बंदोबस्तात याचा प्रारंभ करण्यात आलेला आहे. यावेळी आयआयटी विरोधकांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या संयुक्त मामलेदार संजीवनी सातार्डेकर यांच्याशी चर्चा करून सदर काम त्वरित बंद करण्याची मागणी केली होती. मात्र त्यांनी त्याला पूर्णपणे विरोध दर्शविला होता.

सरकारी कामाला अडथळा निर्माण करण्याच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला होता. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आपली आक्रमक भूमिका मागे घेऊन सीमांकन करणाऱया परिसरातून माघार घेतली होती.

बुधवारी बैठकीत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय.

दरम्यान बुधवारी संध्याकाळी आयआयटी विरोधकांनी जन्मी देवस्थानांमध्ये खास बैठक घेऊन गुरुवारच्या एकूण आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली .सदर बैठकीमध्ये वेगवेगळय़ा स्वरूपाची चर्चा करून गुरुवारी सकाळी सत्तरी तालुक्मयाचे उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांच्या कार्यालयासमोर धरणे धरण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता .त्यानुसार आज सकाळी आयआयटी विरोधक उपजिल्हाधिकारी यांच्या इमारतीसमोर एक तास धरणे कार्यक्रम करण्यात आला .त्यानंतर एका शिष्टमंडळाने राजेश आजगावकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यामध्ये आंदोलनाचे निमंत्रक शुभम शिवलकर शशिकांत सावर्डेकर, राम मळेकर यांचा समावेश होता .यावेळी त्यांनी उपजिल्हाधिकारी यांच्याशी सविस्तरपणे चर्चा करून काम बंद करण्याची विनंती केली.

काम बंद करता येत नाही.

राजेश आजगावकर–फोटो वापरणे.

यावेळी राजेश आजगावकर यांनी काम बंद करता येत नसल्याचे स्पष्ट केले. सदर प्रकल्प हा सरकारचा असून त्याला केंद्रीय सरकारचे पूर्णपणे पाठबळ आहे .यासाठी दहा लाख चौरस मीटर जमीन संपादित केली असून याजमिनीमध्ये सिमांकत कार्याला प्रारंभ झालेला आहे .सदरचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिल्यामुळे याआदेशाचे उल्लंघन न करता येत नाही. त्याचप्रमाणे सरकारच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास नाईलाजास्तव कारवाई करावीच लागेल अशा प्रकारचे माहिती यावेळी त्यांनी दिली.आपल्या समस्या यासंदर्भाचे देण्यात आलेले निवेदन आपण वरि÷ अधिकाऱयांपर्यंत पाठविणार असून त्या संदर्भातील कार्यवाही सदर अधिकारीच करणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. मात्र कायदा हातात घेऊ नका अशा प्रकारची विनंती यावेळी राजेश आजगावकर यांनी केले.

वाळपईच्या परिसरात घोषणाबाजी.

त्यानंतर आयआयटी विरोधकांनी वाळपई परिसरामध्ये घोषणा देऊन याप्रकल्पाचा तीव्र शब्दात निषेध केला. त्याप्रमाणे सरकार मनमानी करीत असून संबंधित भागातील नागरिकांवर अन्याय करीत असल्याचा आरोप केला. त्यानंतर  शहीद स्तंभ परिसरामध्ये छोटेखानी सभा घेण्यात आली. या सभेमध्ये अनेकांनी आपले विचार मांडले .आंदोलनाचे निमंत्रक शुभम शिवलकर यांनी यावेळी सरकार या भागातील नागरिकांच्या जमिनीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला .गेली अनेक वर्षे याभागातील नागरिक काजू व इतर प्रकारच्या उत्पन्नावर आपला उदरनिर्वाह चालवित आहेत. मात्र सरकार आयटीआय प्रकल्पाच्या नावाखाली हा उदरनिर्वाह हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प या भागातून हद्दपार व्हावा यासाठी आंदोलन शेवटच्या टप्प्यापर्यंत देण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला. वाळपई काँग्रेस समितीचे अध्यक्ष दशरथ मांदेकर यांनी यावेळी सरकार व भाजपचे आमदार विश्वजीत राणे यांचा तीव्र शब्दात निषेध केला. विश्वजीत राणे यांनी षडय़ंत्र्ा  निर्माण केले असून याप्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील नागरिकावर अन्याय केल्याचा आरोप केला .काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रणजीत राणे यांनी यावेळी गेल्या अनेक महिन्यापासून आंदोलन  अयशस्वी करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असून त्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला.

Related Stories

किनाऱयांवरील तेलगोळय़ांमुळे भावी परिणामांचा गंभीर प्रश्न

Amit Kulkarni

नावेली जि. पं. निवडणुकीत उतरणार नाही : प्रतिमा कुतिन्हो

Amit Kulkarni

प्रो. फुटबॉलमध्ये वेळसावचा पणजी फुटबॉलर्सचा विजय

Amit Kulkarni

राजकीय स्वार्थासाठी लोबोंकडून टॅक्सी चालकांचा वापर

Amit Kulkarni

सेवानृवृत्तीनिमित्त दुर्गाकुमार नावती यांना पोलीस दलातर्फे निरोप सोहळा

Amit Kulkarni

च्यारी समाज बांधवांनी घराघरात केली रामनवमी साजरी !

Patil_p
error: Content is protected !!