तरुण भारत

गुरुवारी कोरोनाचे सात बळी

प्रतिनिधी / पणजी

राज्यातील कोरोना संकटात गुरुवारी सात जणांचे बळी गेले असून 673 जण नवे कोरोनाबाधीत झाले आहेत. 490 जण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण बळींची संख्या 383 वर पोहोचली असून 5822 एवढे सक्रिय रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. आतापर्यंत एकूण 30552 जणांना कोरोनाची लागण झाली असून 24347 जण त्यातून बरे झाले आहेत.

Advertisements

आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार 246 जणांना संशयित रुग्ण म्हणून गोमेकॉत भरती करण्यात आले असून 427 जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. काल गुरुवारी 2111 जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यातील 673 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह सापडले आहेत.

विविध आरोग्य केंद्रांतील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे ः

डिचोली – 243, सांखळी – 429, पेडणे – 256, वाळपई – 252, म्हापसा – 261, पणजी – 355, हळदोणा – 150, बेतकी – 155, कांदोळी – 151, कासारवर्णे – 79, कोलवाळ – 44, खोर्ली – 211, चिंबल – 232, शिवोली – 209, पर्वरी – 382, मये – 51, कुडचडे – 101, काणकोण – 109, मडगाव – 454, वास्को – 335, बाळ्ळी – 61, कासावली – 149, चिंचिणी – 51, कुठ्ठाळी – 269, कुडतरी – 36, लोटली – 96, मडकई – 87, केपे – 96, सांगे – 87, शिरोडा – 37, धारबांदोडा – 130, फोंडा – 193, नावेली – 68.

  • 24 सप्टेंबरपर्यंतचे एकूण रुग्ण                     30552
  • 24 सप्टेंबर रोजी बरे झालेले रुग्ण                24347
  • 24 सप्टेंबर रोजी सक्रिय कोरोना रुग्ण          5822
  • 24 सप्टेंबरचे कोरोना रुग्ण                         673
  • 24 सप्टेंबर रोजी बरे झालेले रुग्ण                490
  • 24 सप्टेंबरचे कोरोना बळी                        7
  • आतापर्यंतचे एकूण बळी                383

Related Stories

हॉटेल, शॉपिंग मॉल, रिसॉर्ट आजपासून खुली

Omkar B

मडगाव स्कूल कॉम्प्लेक्स पतसंस्थेची सभासदांसाठी आकर्षक वाहन कर्ज योजना

Omkar B

गोवा शिपयार्डने बांधलेले गस्ती जहाज तटरक्षक दलाकडे सुपूर्द

Amit Kulkarni

गोवा माईल्स व इतर टॅक्सी व्यावसायिकांमध्ये पुन्हा खटके परस्परांविरुद्ध पोलीस तक्रारी, दाबोळीतही तणाव

Omkar B

मयडेच्या माजी पंच उर्मिला राऊळ यांचे निधन

Omkar B

मुसळधार पावसातही फोंडा पोलिसांचा कोरोनाशी लढा

tarunbharat
error: Content is protected !!