तरुण भारत

बेळगाव जिह्यात शुक्रवारी कोरोनाचे 234 नवे रुग्ण

रुग्ण संख्या वाढतीच, महिलेसह दोघा जणांचा मृत्यू

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

शुक्रवारी बेळगाव शहर व जिह्यातील 234 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर महिलेसह तिघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून तरीही बाजारपेठेतील गर्दी पाहता कोरोना विषयीचे गांभीर्य हरवत चालल्याचे दिसून येते.

बेळगाव शहर व उपनगरातील 85 व ग्रामीण भागातील 18 असे तालुक्यातील एकूण 103 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बेळगाव येथील एका महिलेसह गेल्या 24 तासांत तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी बेळगाव परिसरातील दोन व खानापूर परिसरातील एकाचा समावेश आहे.

बाधितांवर सिव्हिल हॉस्पिटलसह वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, आयटीबीपीचे जवानांचा यामध्ये समावेश आहे. उपलब्ध माहितीनुसार सांबरा एटीएसमधील 1, राज्य राखीव दलातील 1, आयटीबीपीचे 2, जिल्हा सशस्त्र दलाचे 3 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. तर पोलीस हेडक्वॉर्टर्समधील सहा पोलीस व त्यांच्या कुटुंबियांचे अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

बिम्स्मधील चारहून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. खासगी इस्पितळातील डॉक्टर, कर्मचाऱयाचाही यामध्ये समावेश आहे. रोज जिल्हा सर्व्हेक्षण विभागाकडून एक बुलेटीन प्रसिध्द केले जात होते. यामध्येही खंड पडत आहे. राज्य आरोग्य विभागाकडून जारी करण्यात येत असलेले बुलेटीनही उशीरा येत आहे. यावरुन आरोग्य विभागालाही कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

हिंडलगा, वाघवडे, मुतगा, हिरेबागेवाडी, अष्टे, बस्तवाड, कंग्राळी बी.के., कोंडुसकोप्प, भेंडीगेरी, कडोली, शुक्रवारपेठ-टिळकवाडी, महावीरनगर, जाधवनगर, रामतीर्थनगर, गणेशपूर, नेहरुनगर, शाहूनगर, भाग्यनगर, खणगाव, बसव कॉलनी, फुलबाग गल्ली, सुभाषनगर, संगमेश्वरनगर, बॉक्साईट रोड, बसवण कुडची परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

भांदुर गल्ली, गांधीनगर, हनुमाननगर, श्रीनगर, वंटमुरी कॉलनी, बिम्स् क्वॉर्टर्स, बसव कॉलनी, अजमनगर, खडक गल्ली, मार्कंडेयनगर, पार्वतीनगर, सदाशिवनगर, समर्थनगर, अंजनेयनगर, मजगाव, न्युगांधीनगर, गणेशनगर, सोमवारपेठ-टिळकवाडी, अडकूर परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून बाधितांवर सिव्हिल हॉस्पिटलसह वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.

Related Stories

कोरोनाचा फैलाव मंदावला, मात्र खबरदारी बाळगा!

Rohan_P

भू-सुधारणा कायदा अन्यायकारक

Patil_p

तब्बल दहा महिन्यांपासून रेशनकार्डचे काम ठप्प

Patil_p

शाहूनगर येथील साई मंदिरात कार्तिकोत्सव

Patil_p

आयुष्मान भारत योजनेंतर्गत 19 रुग्णालयात उपचार

Amit Kulkarni

वीज निर्मितीसाठी पाणी सोडण्याचे आदेश

Amit Kulkarni
error: Content is protected !!