तरुण भारत

सांगली जिल्ह्यात 827 कोरोनामुक्त, नवे 607 रूग्ण

प्रतिनिधी / सांगली

शुक्रवारी जिह्यात 827 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नवे 607 रूग्ण वाढले जिह्यात आजअखेर 23 हजार 193 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. पण उपचार सुरू असताना 28 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिह्यातील 26 आणि परजिह्यातील दोघांचा समावेश आहे. एकूण जिह्यात 1233 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे.

महापालिका क्षेत्रात 159 रूग्ण वाढले

महापालिका क्षेत्रात शुक्रवारी 159 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 81 तर मिरज शहरात 78 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आता घर टू घर सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. तसेच ज्यांना कोरोना सदृष्य लक्षणे दिसत आहेत. तसेच कोरोना रूग्णांच्या संपर्कात जे आले आहेत. त्यांची तपासणीही सुरू करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात आजअखेर एकूण रूग्णसंख्या 13 हजार 10 झाली आहे.

ग्रामीण भागात 448 रूग्ण वाढले

शुक्रवारी ग्रामीण भागात 448 नवे रूग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात मोठÎा संख्येने रॅपीड ऍण्टीजन टेस्ट सुरू केल्याने ही रूग्णसंख्या वाढत चालली आहे. तालुकानिहाय वाढलेली रूग्णसंख्या अशी, आटपाडी तालुक्यात 84, जत तालुक्यात 27, कडेगाव तालुक्यात 43 नवीन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 37, खानापूर तालुक्यात 23, मिरज तालुक्यात 65 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 23, शिराळा तालुक्यात 30, तासगाव तालुक्यात 46 आणि वाळवा तालुक्यात 70 रूग्ण वाढले आहेत.

जिह्यातील 26 जणांचा मृत्यू

जिह्यातील 26 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. आटपाडी तालुक्यातील दोघांचा, जत तालुक्यातील एकाचा, कडेगाव तालुक्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील दोघांचा, खानापूर तालुक्यातील दोघांचा, मिरज ग्रामीण भागातील चौघांचा मृत्यू झाला. पलूस तालुक्यातील एकाचा तर शिराळा तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला. वाळवा तालुक्यातील चार जणांचे उपचार सुरू असताना मृत्यू झाले आहेत. जिह्यातील एकूण 26 जणांचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे. आजअखेर 1233 जणांचे मृत्यू झाले आहेत.

परजिह्यातील नवे 24 रूग्ण दाखल

परजिह्यातील नवीन 24 रूग्ण जिह्यात उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यामध्ये कोल्हापूरचे 12, बेळगावचे सात, सोलापूरचे चार आणि धुळेचा एक रूग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे जिह्यात आजअखेर परजिह्यातील 1032 जणांच्यावर उपचार करण्यात आला त्यातील 617 जण कोरोनामुक्त होवून गेले तर 243 जणांच्यावर आता उपचार सुरू आहेत. शुक्रवारी दोन जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये कोल्हापूर जिह्यातील एकाचा, सातारा येथील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आजअखेर 172 जणांचा मृत्यू झाला आहे.

23 हजार 193 जणांची कोरोनावर यशस्वी मात

जिह्यात शुक्रवारी 827 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सलग सहाव्या दिवशी वाढलेल्या नवीन रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या अधिक असल्याने जिह्याला दिलासा मिळत चालला आहे. जिह्यात आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या ही 23 हजार 193 झाली आहे. जवळपास 70 टक्के रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिह्यात मोठÎाप्रमाणात रूग्ण वाढत असतानाच कोरोनामुक्त होणारे रूग्णही वाढत चालल्याने जिह्याला हा मोठा दिलासा मिळत आहे. त्यामध्ये सलग सहा दिवस वाढलेल्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या मोठÎाप्रमाणात आहे. त्यामुळे आता जिल्हयाला चांगलाच दिलासा मिळत चालला आहे.

2725 जणांचे स्वॅब तपासले

जिह्यात शुक्रवारी दोन हजार 725 जणांचे स्वॅब तपासले आहेत. यामध्ये आरटीपीसी मधील 1380 स्वॅब तपासणी केली तर रॅपीड ऍण्टीजन टेस्टमध्ये एक हजार 1415 जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये नवीन 607 रूग्ण आढळून आले आहेत.

कोरोनाची जिह्यातील स्थिती
एकूण रूग्ण 32832
बरे झालेले 23193
उपचारात 8406
मयत 1233

Related Stories

सांगली जिल्ह्यात दुपारी साडेतीन पर्यंत 68 टक्के मतदान

Abhijeet Shinde

सांगलीतील आणखी 46 एसटी कर्मचार्‍यांना कोरोना बाधा

Abhijeet Shinde

राज्यात लवकरच फिरते पशु चिकित्सालय सुरु करणार : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

Abhijeet Shinde

MPSC EXAM : परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम 144 लागू

Abhijeet Shinde

सांगली : वाळव्यात ‘त्या’ पॉझिटिव्ह पोलीस कर्मचाऱ्याचीआई,पत्नी ही पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

जलसंपदा मंत्री जयंत पाटील कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!