तरुण भारत

गलवान संघर्ष : चीनचा कबुलीजबाब

केवळ पाच सैनिक ठार झाल्याचा दावा : भारताकडून साशंकता

वृत्तसंस्था/ बीजिंग

Advertisements

पूर्व लडाखच्या गलवान खोऱयात 15 जूनला झालेल्या चीन-भारत जवानांमधील संघर्षात आपल्या लष्कराला झालेल्या दगाफटक्याबाबत अखेर चीनने कबुलीजबाब दिला आहे. गलवानमधील संघर्षात किती सैनिक मारले गेले याची माहिती चीनकडून आतापर्यंत देण्यात आली नव्हती. मात्र शुक्रवारी प्रथमच चीनने कबुली देत या संघर्षात एका कमांडिंग अधिकाऱयासह आपले 5 सैनिक मारले गेल्याचे मान्य केले. माल्डो येथील चर्चेत चीनने ही गोष्ट मान्य केली. या संघर्षात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते.

चीनने पाच सैनिक मारले गेल्याचा दावा केला असला तरीही अमेरिका आणि भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चीनचे जवळपास 40 जवान मारले गेले आहेत. मात्र, चीन आतापर्यंत नेमक्या आकडेवारीबाबत मौन बाळगून होता. आता त्यांनी माल्डामध्ये पाच सैनिक ठार झाल्याचे मान्य केले असले तरी या आकडेवारीबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.

गलवान खोऱयातील संघर्षानंतर भारताने चीनला धक्काबुक्की आणि झडप अशी कारवाई अजिबात सहन केली जाणार नाही, असा इशारा दिला होता. यानंतर थेट संघर्षात घट झाली असली तरी बऱयाच ठिकाणी सैनिक आमने-सामने आलेले आहेत. दुसरीकडे तणावाचे मुद्दे चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यावरही भर दिला जात आहे. चर्चेदरम्यान, चीनने पेंगोंग सरोवराजवळील उंचीवरील भागातील सैन्य भारताने मागे घ्यावे असे चीनने म्हटले. यावर भारताने लडाख भागातील स्थितीचे निराकरण करण्यावर भर दिला आहे.

Related Stories

व्यापारी गुपिते चोरणाऱया चिनी नागरिकाला अमेरिकेत अटक

Patil_p

जर्मनीत नियंत्रण

Omkar B

‘या’ देशात बलात्काऱ्यांना करणार नपुंसक

datta jadhav

ऑस्ट्रेलियात परदेशी पत्रकारांवर निर्बंध

datta jadhav

…अशी महामारी पाहिलीच नव्हती!

Patil_p

ब्रिटिश पंतप्रधानांनी गुपचूप उरकला विवाह

Patil_p
error: Content is protected !!