तरुण भारत

दिल्लीत 3,827 नवे कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीत मागील 24 तासात 3,827 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 24 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 64 हजार 450 वर पोहचली आहे. यामधील 30,867 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Advertisements
  • एका दिवसात 4,061 रुग्ण कोरोनामुक्त


दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 4,061 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 2 लाख 28 हजार 436 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5,147 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

   
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 28 लाख 15 हजार 650 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 11,797 आरटीपीसीआर टेस्ट आणि 47,337 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. 


सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 6.47 % आहे. तर 2124 झोन आणि 150 कंट्रोल रूम आहेत. 

Related Stories

इराणमध्ये खामनेईंच्या विरोधात निदर्शने

Patil_p

गांधी जयंती निमित्त रोटरी वेणुग्रामतर्फे रक्तदान

Patil_p

जीआयसॅट-1 चे प्रक्षेपण लांबणीवर

tarunbharat

लष्कराचा ‘तो’ जवान 18 दिवसांपासून बेपत्ता

datta jadhav

भाजप मंत्री पोहोचले चक्क जीवंत जवानाच्या घरी श्रद्धांजली वाहण्यासाठी

Abhijeet Shinde

पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 2734 वर 

Rohan_P
error: Content is protected !!