तरुण भारत

एटीएममध्ये रक्कम भरणाऱया वाहनास आग

प्रतिनिधी/ पर्वरी

बँकांमधील एटीएमसाठी रक्कम पुरविणाऱया वाहनाला आग लागून लाखो रुपयांची हानी झाली आहे. सुदैवाने वाहनात रोकड नसल्याने मोठी हानी टळली. ही घटना म्हापसाहून पर्वरीकडे येताना दामियान द गोवा पर्वरी येथे शुक्रवारी दुपारी 2.30 वा. घडली.

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, काल शुक्रवारी 25 रोजी दुपारी 2.30 वा. सुमारास जीए 03 एन 8701 ही टाटा झेनीन वाहन म्हापसा येथील गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी नेण्यात आले होते. परंतु काही कारणास्तव वाहनाची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे परत पर्वरी येथे आणत असताना चालत्या वाहनाने पेट घेतला. वाहनचालकाने प्रसंगावधान राखून वाहन महामार्गाच्या बाजूने उभे करून बाहेर उडी घेतल्याने तो वाचला.

वाहन चालकाने आरडाओरड करून मदतीची याचना केली. तोपर्यंत पर्वरी पोलिस व आग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. अग्निशामक बंब येईपर्यंत वाहन जळून खाक झाले. वाहन दुरुस्तीला नेल्याने आतील रक्कम काढून ठेवली होती. सुदेश रेडकर यांनी पंचनामा केला.

Related Stories

प्रश्नपत्रिकेतील हा प्रश्न सरकारचे पितळ उघडे पाडणारा

Omkar B

आरोलकरांच्या पक्ष प्रवेशाची सभा पोलिसांनी उधळली

Patil_p

बॅडमिंटनपटू तनिशा क्रास्टोला स्कॉटलँड स्पर्धेत दुहेरीत रौप्यपदक

Amit Kulkarni

अमरावती एक्सप्रेस रुळावरुन घसरली

Amit Kulkarni

आपल्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न : प्रभुदेसाई

Amit Kulkarni

स्वामी विवेकानंदजी करोडो युवकाचे प्रेरणास्थान

Amit Kulkarni
error: Content is protected !!