तरुण भारत

चिपळुणात तीन पोपटांना पिंजऱयांतून मुक्ती

   प्रतिनिधी / चिपळूण

दसपटीतील एका ठिकाणी घरात पाळलेल्या 3 पोपटांसह पिंजरा ताब्यात घेऊन वनविभागाने या पोपटांना शुक्रवारी पिंजऱयातून मुक्त केले आहे.

Advertisements

 कोकणात खेडेगावांमध्ये सर्रासपणे घरांमध्ये पोपट पाळले जातात. पिंजऱयात बंद करून पोपट पाळण्याचा अनेकांना छंद आहे. मात्र अशा कृतीवर वनविभागाच्या अधिनियमानुसार दंडासह शिक्षेची तरतूद आहे. पिंजऱयांत पोपट पाळलेला आढळल्यास संबंधितांवर वनविभागाकडून गुन्हा दाखल करण्यासह 25 हजाराचा दंड ठोठावला जातो. असे असतानाही दसपटीतील एका गावातील घरात लहान मुलांनी तीन पोपट पाळले होते. या संदर्भात कुणीतरी याची माहिती दिल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱयांनी घरी जाऊन हे पोपट पिंजऱयासह ताब्यात घेतले. संबंधिताना या बाबत कडक समजही देण्यात आली. शुक्रवारी या पोपटांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Related Stories

ठोक निधीसाठी राजापूर न.प.तील सत्ताधाऱयांचे आंदोलन

Patil_p

मराठीतील लोकप्रिय कवितांचा वीस बोलीभाषांमध्ये अनुवाद

NIKHIL_N

सततच्या नैसर्गिक आपत्तीतून सजग होणे आवश्यक!

Patil_p

जिह्यातील एकमेव रूग्णही कोरोनामुक्त

tarunbharat

खून प्रकरणातील दुसऱया आरोपीसही पोलीस कोठडी

Patil_p

‘रोटरी’च्या अनुष्का म्हातलेची राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड

triratna
error: Content is protected !!