तरुण भारत

पांढऱया चिपीचे होणार जतन, संरक्षण!

चिपी राज्य कांदळवन वृक्ष म्हणून संरक्षित

प्रतिनिधी/ रत्नागिरी

Advertisements

त्सुनामी, समुद्र किनाऱयाची होणारी धूप व इतर नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करणाऱया कोकण किनारपट्टीवर मोठय़ा प्रमाणात आढळणाऱया पांढरी चिपी या कांदळवृक्षास राज्य शासनाने राज्य कांदळवन वृक्ष म्हणून घोषित केले आह़े कांदळवृक्ष म्हणून जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आह़े

 प्रत्येक राज्यात राज्य प्राणी, राज्यपक्षी, राज्यवृक्ष व राज्य फुलपाखरु अशी राज्याची मानचिन्हे आहेत़ देशात आजपर्यंत कोणत्याही राज्याने राज्य कांदळवन वृक्ष म्हणून कोणताही वृक्ष घोषित केला नव्हत़ा  त्यामुळे महाराष्ट्र हे कांदळवन वृक्ष घोषित करणारे पहिले राज्य ठरले आह़े  या बाबतचा शासन निर्णय नुकताच घोषित करण्यात आला आह़े यामुळे या वैशिष्टय़पूर्ण वृक्षाचे संवर्धन होण्यास मदत होणार आह़े

   राज्यात या वृक्षाच्या सुमारे 20 प्रजाती आहेत़ कांदळवने ही त्सुनामी लाटा, समुद्र किनाऱयाची होणारी धूप रोखण्यात मदत करतात़ अनेक समुद्री प्रजातींचे प्रजनन कांदळवनात होत असत़े वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी हे वृक्ष फायदेशीर ठरतात़ या वृक्षाचे महत्व ओळखून 2012 साली राज्य शासनाने स्वतंत्र कांदळवन कक्षही स्थापन केला आह़े

  सोनेरेशिया अल्बा असे शास्त्राrय नाव असणाऱया हा कांदळवन वृक्ष स्थानिक पातळीवर पांढरी चिप्पी म्हणून ओळखला जात़ो या चिप्पीला येणारी फुले सुगंधी असतात़ या फुलांच्या गंधाने मधमाश्या, कीटक व पक्षी आकर्षित होतात़ त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱया या वृक्षाचे महत्व जतन, संरक्षण व्हावे म्हणून राज्य शासनाच्या राज्य वन्यजीव मंडळाने पांढरी चिप्पी या कांदळवन वृक्षास  राज्य कांदळवन वृक्ष म्हणून मान्यता दिली आह़े  

 कांदळवनामुळे चक्रीवादळाचा वेग झाला कमी

नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा वाऱयाचा वेग कांदळवन वृक्षामुळे कमी झाला. वादळामधील हवेचा दाबही या वृक्षामुळे कमी झाल़ा कांदळवन हवेतील कार्बन शोषून घेतेच शिवाय मुळांमध्येही कार्बन शोषून ठेवत़े आंब्याच्या 3-4 पट जास्त हवेतील कार्बन हे झाड शोषून घेत़े

Related Stories

चिपळुणात गुरे वाहतूक करणारा कंटेनर पकडला

Omkar B

औषध समजून कीटकनाशकाचा डोस

NIKHIL_N

शिवप्रसाद कोळंबेकर यांना मातृशोक

Ganeshprasad Gogate

शृंगारतळी पुन्हा कोरोनाची एन्ट्री

Patil_p

अनुकूल हवामानामुळे मच्छीमारांच्या जाळ्य़ात मासळी!

Patil_p

अनेक गाडय़ा अन्य मार्गे वळविल्या, काही रद्द

NIKHIL_N
error: Content is protected !!