तरुण भारत

‘आयएनएस’च्या कार्यकारिणीपदी किरण ठाकूर यांची फेरनिवड

अध्यक्षपदी `हेल्थ अँड द अँटिसेप्टिक’चे एल. आदिमुलम

प्रतिनिधी / बेंगळूर

Advertisements

इंडियन न्यूज पेपर सोसायटीच्या (आयएनएस) नूतन अध्यक्षपदी `हेल्थ अँड द अँटिसेप्टिक’चे एल. आदिमुलम यांची निवड करण्यात आली आहे. `तरुण भारत’चे समूह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकूर यांची कार्यकारिणीवर फेरनिवड झाली आहे. बेंगळूर येथे शुक्रवार दि. 25 रोजी झालेल्या बैठकीत 2020-21 या वर्षासाठी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली.

`आयएनएस’ ही देशातील वृत्तपत्र-मासिके-पाक्षिके यांच्या संपादकांचा समावेश असलेली ही संस्था आहे. `इकॉनॉमिक टाईम्स’चे मोहित जैन यांची उपाध्यक्ष आणि डी. डी. पूरकायस्था (आनंद बझार पत्रिका) यांची उपकार्याध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. तसेच `आज समाज’चे राकेश शर्मा यांची खजिनदारपदी तर मेरी पॉल यांची कार्यकारी महासचिव म्हणून निवड करण्यात आली. अध्यक्षपदी निवड झालेले आदिमुलम हे तामिळनाडूच्या दिनामालार वृत्तपत्राचे संपादक लक्ष्मीपती यांचे सुपुत्र आहेत.

`आयएनएस’च्या अध्यक्षपदी एल. आदिमुलम

कार्यकारिणीतील अन्य सदस्य पुढीलप्रमाणे ः एस. बालसुब्रमण्यम आदित्यन (डेली थंथी), गिरीश अग्रवाल (दैनिक भास्कर), संहित बाळ (प्रगतीवाडी), गौरव चोप्रा (फिल्मी दुनिया), विजय कुमार चोप्रा (पंजाबी केसरी जालंदर), करण राजेंद्र दर्डा (लोकमत-औरंगाबाद), विजय जवाहरलाल दर्डा (लोकमत-नागपूर), जगजीत सिंग दर्दी, विवेक गोएंका (द इंडियन एक्सप्रेस मुंबई), महेंद्र मोहन गुप्ता (दैनिक जागरण), संजय गुप्ता (दैनिक जागरण वाराणसी), प्रदिप गुप्ता, शिवेंद्र गुप्ता, सरविंदर कौर, श्रेयांश कुमार, डॉ. आर. लक्ष्मीपती (दिनामलार), तन्मय माहेश्वरी, विलास मराठे (दैनिक हिंदुस्थान अमरावती), हर्ष मॅथ्यू, दिनेश मित्तल, नरेश मोहन, अनंत नाथ, प्रताप पवार (सकाळ), राहुल राजखेवा, आर. एम. आर रमेश, के. राजा प्रसाद रेड्डी, अतीदेब सरकार, प्रवीण सोमेश्वर, बिजू वर्गीस, आय. वेंकट, विनय वर्मा, होरमुसजी कामा, कुंदन व्यास, के. एन. तिलककुमार (डेक्कन हेरॉल्ड व प्रजावाणी), रवींद्रकुमार, किरण वडोरियो, पी. व्ही. चंद्रन, सोमेश शर्मा, जयंत मेमन मॅथ्यू आणि शैलेश गुप्ता (मिड-डे).

Related Stories

नेहरूनगरमधील समस्यांकडे मनपाचे दुर्लक्ष

Amit Kulkarni

औद्योगिक वसाहतीचे काम आजपासून बंद पाडणार

Patil_p

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱयांना भरपाई द्या

Amit Kulkarni

करोनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दक्षता

Patil_p

व्हॅक्सिन डेपो येथे वृक्षतोड होऊ देणार नाही

Amit Kulkarni

पत्रकाराच्या कुटुंबीयांना पालकमंत्र्यांकडून आर्थिक मदत

Omkar B
error: Content is protected !!