तरुण भारत

जीएसटी अधिकारी सीबीआयच्या जाळय़ात

प्रतिनिधी/ बेळगाव

पाच लाखाची लाच घेताना जीएसटी विभागातील तीन अधिकाऱयांना सीबीआयने अटक केली आहे. बेळगाव येथे ही कारवाई करण्यात आली असून त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

Advertisements

जीएसटी विभागातील अधीक्षक व निरीक्षक अशा तिघा जणांवर ही कारवाई झाली असून अटक करण्यात आलेल्या तिघा जणांना सीबीआयने धारवाड येथील न्यायालयात हजर केल्याची माहिती मिळाली आहे. प्रत्यक्षात 20 लाखांची मागणी करण्यात आली होती. 5 लाख रुपये स्वीकारताना तिघा जणांना अटक झाली आहे.  एका उद्योजकाकडून लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली असून जीएसटी विभागात काम करणारा एक निरीक्षक, दोन अधिक्षकांनी एकूण 20 लाखाची लाच मागितली होती. पहिला हप्ता पाच लाख रुपये स्वीकारताना सीबीआयने तिघा जणांना अटक केली आहे, अशी माहिती मिळाली आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत सीबीआयकडून मात्र या संबंधी कसलीच अधिकृत माहिती दिली गेली नाही.

Related Stories

पूरस्थिती उद्भवल्यास 26 बोटींची व्यवस्था

Omkar B

निजगुणानंद स्वामीजींसह पुरोगामींना धमकीचे पत्र

Patil_p

‘वॉक मोअर-रेस्टलेस’वॉकरूचे नवे कॅम्पेन

Amit Kulkarni

रोटरी क्लबतर्फे नावगे येथे हँडवॉश नळाची सोय

Patil_p

आणखी किती दिवस अडचणीतून जायचे?

Patil_p

कृषी कायदा तातडीने रद्द करावा

Patil_p
error: Content is protected !!