तरुण भारत

ड्रग्ज प्रकरण : एनसीबीकडून अंधेरीत 4 ठिकाणी छापे

ऑनलाईन टीम / मुंबई : 


बॉलीवुडमधील अनेक सेलिब्रिटींची नावे ड्रग्ज प्रकरणात समोर आली आहेत. त्यानंतर एनसीबीकडून तपासणीला वेग आला आहे. एनसीबीने सारा अली खान, दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंह यांना समन्स बजावले असून चौकशीसाठी बोलावले आहे. 

  • दीपिकाचा मोबाईल एनसीबीच्या ताब्यात


आज अभिनेत्री दीपिका पादुकोणची चौकशी सुरु आहे. चौकशी दरम्यान दीपिकाचा मोबाईल फोन एनसीबीने ताब्यात घेतला असून अजूनही दीपिकाची चौकशी सुरू आहे.


एनसीबीने क्षितिज प्रसाद कडून मिळालेल्या माहिती नंतर आज सकाळी अंधेरीत 4 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. मात्र याबाबत विस्तृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. 

  • श्रद्धा कपूर एनसीबी कार्यालयात दाखल


तर दुसरीकडे, सारा अली खान दुपारी 12.30 वाजता तर श्रद्धा कपूर एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाली आहे, अशी माहिती मिळाली आहे. 

Related Stories

भारताचा लडाख सीमेवर युद्धसराव; लढाऊ विमानांचाही सहभाग

datta jadhav

पेट्रोल – डिझेलच्या किंमतीत सलग तिसऱ्या दिवशी वाढ

pradnya p

… त्यामुळे मोहरम मिरवणुकीस परवानगी नाही : सर्वोच्च न्यायालय

pradnya p

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास लागू शकतात पाच वर्ष : सौम्या स्वामिनाथन 

pradnya p

‘COVAXIN’ च्या मानवी चाचणीस सुरुवात

datta jadhav

नागपुराच पावसाची रिमझिम सुरू ; वादळी वाऱ्याची शक्यता

triratna
error: Content is protected !!