तरुण भारत

स्थानिक लांब पल्ल्याच्या बसेस पूर्ववत सेवेत

प्रतिनिधी / बेळगाव

कर्नाटक राज्य परिवहन मंडळाने आंतरराज्य बससेवा सुरू केली आहे. बेळगाव आगारातून रोज मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा या गावांसाठी 60 ते 70 बसेस धावत आहेत. मात्र सावंतवाडी, हैदराबाद या शहरांसाठी अद्याप बससेवा सुरू नाही. तसेच लांब पल्ल्यासाठी धावणाऱया वातानुकुलीत बसेसनासुद्धा अद्याप परवानगी मिळालेली नाही.

Advertisements

लॉकडाऊनपूर्वी बससेवेचे जे वेळापत्रक होते त्यानुसारच गाडय़ा धावत आहेत. त्यातही राज्यांतर्गत धावणाऱया बसेसना प्रवाशांचा प्रतिसाद उत्तम आहे. मात्र महाराष्ट्रात जाणाऱया गाडय़ांना अल्पप्रतिसाद आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचे संकट हे अधिक गडद असल्याने प्रवासी तेथे जाण्यास राजी नाहीत.

बेळगावला कोल्हापूर आगाराच्या बसेस येत आहेत. मात्र सांगली, सातारा, पुणे, मुंबई येथून अद्याप बसेस येत नाहीत. एकीकडे उत्पन्न वाढीसाठी परिवहन मंडळ प्रयत्नशील आहे. परंतु प्रवाशांच्या मनात अद्याप भीती असल्याने बस प्रवास करण्यास त्यांची तयारी नाही.

एकूणच परिवहन मंडळ आपल्या परीने प्रयत्न करत असून काही दिवसांनी कोरोनाची तीव्रता कमी होईल आणि प्रवाशांची संख्या वाढेल, असा विश्वास मंडळाला वाटतो. बसमध्ये प्रवास करतानासुद्धा कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे मंडळाने कळविले आहे.

Related Stories

माधुरी शानभाग यांच्याकडून सरस्वती वाचनालयाला पुस्तके भेट

Omkar B

खानापूर तालुक्यात शनिवारी १० नव्या कोरोना बाधितांची नोंद

Rohan_P

साऊथ झोन ऍथलेटिक्स स्पर्धेत तुषार भेकणेला सुवर्ण

Amit Kulkarni

ए. एच. मोतीवाला यांना आदर्श रत्नशास्त्री पुरस्कार

Patil_p

सीसीए, एनआरसी कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही

Patil_p

निवडणूक काळात बेजबाबदारपणा केल्यास कठोर कारवाई

Patil_p
error: Content is protected !!