तरुण भारत

ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर 17 धावांनी विजय

वृत्तसंस्था / ब्रिस्बेन

यजमान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघामध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जात आहे. या मालिकेतील शनिवारी येथे झालेल्या पहिल्या सामन्यात विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया महिला संघाने न्यूझीलंडचा 17 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. या सामन्यात ऑस्ट्रेलियातर्फे स्कट आणि गार्डनर यांची कामगिरी दर्जेदार झाली.

Advertisements

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 6 बाद 138 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या ऍश गार्डरने 41 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 61 धावा जमविल्या. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली होती. प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडने 121 धावापर्यंत मजल मारली. 18 व्या षटकांत न्यूझीलंडची स्थिती 5 बाद 105 अशी होती पण त्यानंतर त्यांना शेवटच्या दोन षटकांत फटकेबाजी करता आली नाही. न्यूझीलंडच्या डिव्हाईनने 29 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियातर्फे स्कटने महत्त्वाचे दोन गडी बाद करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या मालिकेनंतर उभय संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जाणार आहे.

Related Stories

स्पेनचे टेनिसपटू मॅन्युएल सँटाना कालवश

Patil_p

कोरोनाबाधित मिल्खा सिंग इस्पितळात

Patil_p

भारतीय महिला क्रिकेट संघाला नवे कसोटी किट

Amit Kulkarni

जर्मनीच्या केर्बरला हरवून फर्नांडिझ उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

बहरिन ग्रां प्रिमध्ये मर्सिडीजचा हॅमिल्टन विजेता

Patil_p

भारत-इंग्लंड महिला हॉकी लढत आज

Patil_p
error: Content is protected !!