तरुण भारत

सीएसकेच्या चाहत्यांना आठवतोय सुरेश रैना!

चेन्नई सुपरकिंग्स संघाला लागोपाठ दोन सामने गमवावे लागल्यानंतर या संघाच्या चाहत्यांनी आता सुरेश रैनाला पुन्हा संघात पाचारण करण्याची मागणी केली. चेन्नई सुपरकिंग्सचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी मात्र रैनाने स्वतः माघार घेतली असून आम्हाला त्याच्या निर्णयाचा आदर असल्याचे सांगत एका अर्थाने त्याचे पुनरागमन शक्य नसल्याचेच स्पष्ट केले आहे. चेन्नईला राजस्थान रॉयल्स व दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सलग दोन्ही सामने गमवावे लागले असून त्यानंतर सोशल मीडियावर यावरुन बऱयाच प्रतिक्रिया उमटत आहेत. वास्तविक, डावखुरा सुरेश रैना यंदा चेन्नई सुपरकिंग्स पथकासमवेत संयुक्त अरब अमिरातीत आयपीएल खेळण्यासाठी दाखल झाला होता. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसमवेत दि. 15 ऑगस्ट रोजी त्यानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अनपेक्षित निवृत्ती जाहीर केली. पण, नंतर काहीच कालावधीत वैयक्तिक कारणास्तव आपण यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून माघार घेत असल्याची घोषणा करत त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. भारतात परतल्यानंतर विभिन्न प्रतिक्रिया उमटत असताना रैनाने पुन्हा आपण युएईमध्ये पोहोचून संघात दाखल होऊ शकतो, असे संकेत दिले. पण, व्यवस्थापनाने त्याला अनुकूल मत व्यक्त केले नव्हते. या संघाचे सीईओ विश्वनाथन यांनी शनिवारी देखील आपण रैनाचा फारसा विचार करत नसल्याचे स्पष्ट केले.

Related Stories

जुलैपर्यंतच्या सर्व बॅडमिंटन स्पर्धा तहकूब

Patil_p

चेन्नईचे फलंदाज सरकारी नोकरांसारखे वागताहेत!

Patil_p

मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा 10 ते 31 जानेवारीपर्यंत

Patil_p

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जेत्यांचा क्रीडामंत्र्यांच्या हस्ते सन्मान

Patil_p

लंकेचे विंडीजला 375 धावांचे आव्हान

Amit Kulkarni

अमेरिकेची सोफिया केनिन नवी सम्राज्ञी

Patil_p
error: Content is protected !!