तरुण भारत

शासकीय बंगल्याच्या बीलांवर मंत्र्यांची नावे

प्रतिनिधी/ वास्को

मुरगावचे आमदार व नगरविकासमंत्री मिलिंद नाईक वापरीत असलेल्या हेडलॅण्ड सडय़ावरील शासकीय बंगल्यावरील वीज व पाण्याची बिले त्यांच्याच नावावर येत असल्याने प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हा प्रकार गैर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सरकारने हा बंगला त्यांच्या नावावर केलेला आहे काय असा प्रश्न उपस्थित करून हा एक घोटाळा असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. सरकारने याची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी यासंबंधी केली आहे.

हल्लीच मंत्री मिलिंद नाईक यांच्या नवीन खासगी बंगल्याच्या नवीन वीज जोडणीचे बिल समाजमाध्यमांवर फिरत राहिल्याने चर्चेत आले होते. ते बील केवळ 172 रूपये होते. याला प्रत्युत्तर म्हणून मंत्र्यांची पाठराखण करण्यासाठी कुणी तरी मंत्री मिलिंद नाईक आपल्या शासकीय बंगल्याची हजारो रूपयांची वीज बिले भरत असल्याचे दाखवणारे बील समाजमाध्यमांवर फिरू लागले. या बिलांवर मंत्री मिलिंद नाईक यांचे नाव असल्याचे पाहून शासकीय बंगल्याच्या वीज बिलांवर मंत्र्यांचे नाव असणे हा प्रकार असल्याचा दावा करून संकल्प आमोणकर यांनी या प्रकरणी मंत्री मिलिंद नाईक यांनीच खुलासा करावा, वीजमंत्र्यांनीही खुलासा करावा आणि सरकारने याची संखोल चौकशी करावी अशी मागणी करून हा घोटाळा असण्याचा संशय व्यक्त केला.

172 रूपयांच्या वीज बीलाबाबत संशय, खुलासा करण्याची मागणी

यासंबंधी शनिवारी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री मिलिंद नाईक यांच्या नवीन खासगी बंगल्याच्या 172 रूपयांच्या बिलाबाबतही संशय व्यक्त केला. त्या बंगल्यात माणसे राहातात. बंगल्यावर वीजेच्या झगमगटासह गणेश चतुर्थीही साजरा झाली. त्यामुळे बंगल्यात कुणी राहात नाही. वीज वापरात येत नाही या दावा चुकीचा आहे. या बिलाबाबत मंत्र्यांनी स्वताहून खुलासा करण्याची गरज आहे. वीज खात्याच्या अभियंत्याने त्यांच्यावतीने खुलासा करणे गैर असल्याचे आमोणकर म्हणाले.

सर्व मंत्र्यांची लॉकडाऊनच्या काळातील वीज बीले जाहीर करा

मंत्री मिलिंद नाईक 2012 सालापासून बोगदा येथील वीज खात्याच्या बंगल्यात राहातात. या शासकीय बंगल्याचा वीज पाण्यासह सर्व प्रकारच्या देखभालीचा खर्चही सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केला जातो. त्यांचे कार्यकर्ते मात्र, मंत्रीच बील भरत असल्याचे समाज माध्यमांवर शासकीय बीले टाकून भासवत आहेत. प्रत्यक्षात जनतेचे लाखों रूपये मंत्र्यांच्या सेवेसाठी खर्च होतात. मंत्री केवळ महिन्याचे भाडे सरकारला देत असतात. त्यामुळे शासकीय बंगला त्यांची वयक्तीक मालमत्ता नाही. त्यामुळे या बंगल्याची बीले त्यांच्या नावावर असू शकत नाहीत. हा प्रकार चुकीचा असल्याचा दावा त्यांनी केला. केवळ मंत्री मिलिंद नाईक यांच्याबाबतीतच हा प्रकार झालेला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या मंत्र्यांना मंत्रीमंडळातून डच्चू द्यावा व सरकारने याची चौकशी करावी अशी मागणी आमोणकर यांनी पत्रकार परिषदेत केली. जनतेच्या माहितीसाठी लॉकडाऊनच्या काळातील राज्यातील सर्व मंत्र्यांची वीज बिलेही सरकारने जाहीर करावीत आमोणकर यांनी केली आहे. यावेळी मुरगाव काँग्रेसचे गट अध्यक्ष महेश नाईक, जयेश शेटगावकर, विठ्ठलदास बांदेकर, सचिन भगत उपस्थित होते.

मंत्री नाईक यांच्या बीलासंबंधी वीज खात्याचा खुलासा

दरम्यान, मंत्री मिलिंद नाईक यांच्या नव्या खासगी बंगल्यातील वीज बीलासंबंधी वीज खात्याने माहिती व प्रसिध्दी खात्याच्या माध्यमातून खुलासा केला आहे. वीज खात्याने केलेल्या खुलाशानुसार मंत्री मिलिंद नाईक यांची सदर मालमत्ता नवीन आहे व त्याचा वापर अद्याप झालेला नाही. प्रत्यक्षात ते बील 15 जून ते 4 ऑगष्टपर्यंतच्या काळासाठी म्हणजेच 50 दिवसांसाठीचे आहे. हे बील प्रत्यक्षात 1032 रूपयांचे असून ग्राहकाने आगाऊ भरलेले 860 रूपये वजा करून हे बील 172 रूपयांपर्यंत आलेले आहे. त्यामुळे मंत्र्यांना कमी बील आकारण्यात आल्याचे वीज खात्याबाबत लोकांमध्ये गैरसमज निर्माण शकतो. त्यामुळेच हा खुलासा करण्यात येत असल्याचे संबंधीत खात्याने म्हटले आहे.

दरम्यान, वीज खात्याचे साहाय्यक अभियंते आर. के. कुलकर्णी यांनी वीज बीलांवरील मंत्री नाईक यांच्या नावासंबंधी खुलासा करताना यात कोणताही गैरप्रकार नसल्याचे स्पष्ट करून सरकारी आदेश व नियमांप्रमाणेच त्यांचे नाव बीलांवर आलेले असल्याचे म्हटले आहे. सदर निवासस्थान सरकारी असून जोपर्यंत मंत्री मिलिंद नाईक त्या बंगल्यात असतील तोपर्यंत त्यांच्याच नावावर बील येईल. दुसरा कुणी त्या बंगल्यात राहायला आल्यास त्या व्यक्तीचे नाव बीलावर येईल. यात कोणताही घोळ नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

घाऊक मासळी मार्केटचा वाद शिंगेला आठ वाहनाची नासधुस

Patil_p

साहित्य निर्मिती होत राहिल..तोपर्यंत वाचन सांस्कृती टिकेल..!

Patil_p

पश्चिम बंगालचे 160 कामगार आपल्या गावी जाण्याच्या मार्गावर

Omkar B

संचारबंदीतही माशेलात तळीरामांचा स्वैर संचार

Omkar B

फातोडर्य़ात आज अग्रस्थानावरील मुंबईशी चेन्नईन एफसीची लढत

Amit Kulkarni

सरकारने गृह कर्ज योजना रद्द करत सरकारी कर्मचाऱयांवर अन्याय केला

Omkar B
error: Content is protected !!