तरुण भारत

सांगलीत साकारले आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान

एबीपी स्कूल येथे नविन क्रिकेट अकॅडमीचा शुभारंभ

प्रतिनिधी / सांगली

जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंना चांगल्या दर्जाचे व सर्व सोयींनी युक्त असे प्रशिक्षण व सराव करण्याच्या उद्देशाने शहरातील आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट ग्राउंड व चार टर्म विकेट व एक ऑस्टो टर्फ विकेटस् तयार करण्यात आल्या आहेत. रोहित शर्मा किक किंगडम व सुमित स्पोर्टस् यांच्यावतीने आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल येथे नवीन क्रिकेट अकॅडमीचा नुकताच शुभारभ करण्यात आला.

या अकॅडमीमध्ये क्रिकेटची सर्व अत्याधुनिक अशी साधने उपलब्ध ठेवण्यात आली आहेत. विशेष करुन सांगली जिल्हयातील क्रिकेट खेळाडूंना याचा उपयोग होणार आहे. शुभारंभ प्रसंगी किक किंगडमचे इंडिया हेड पराग दहिवाल, पुणे अकॅडमीचे हेड कोच सुमित जंगम श्रीनिवास मानधना आदी उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी वसंत बंडूजी पाटील ट्रस्टचे चेअरमन समीर बिरनाळे हे उपस्थित होते.

यावेळी सुमित स्पोर्टस् चे संचालक सुमित चव्हाण य प्रशांत कोरे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. तसेच अकॅडमीच्यावतीने सांगली जिल्हयातील राज्य व रणजी खेळाडूंचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी प्रितेश कोठारी, राहुल आरवाडे, युसुफ जमादार, रोहन बिनीवाले, शिरीष राठे, राकेश उबाळे, अश्विनी बिनीवाले, अनंत तांबावेकर, प्रकाश फाळके, विज्ञान माने आदी वसस्थित होते. जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष व महाराष्ट्र निवेट संघटनेचे सदस्य संजय बजाज, प्रशिक्षक अनिल जोब आदींनी शुभेच्छा दिल्या. त्या कार्यक्रमासाठी एबीपी स्कूलचे डायरेक्टर सागर बिरनाळे यांचे सहकार्य लाभले. तर क्रिकेटचे सुसज्ज मैदान तयार केल्याबद्दल व्ही स्क्वेअर, पुण्याचे विशाल पवार यांचा सत्कार श्रीनिवास मानधना व समीर बिरनाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

Related Stories

डीसीपीएस बांधवांच्या प्रश्नाकरिता शिक्षक परिषदेची सायकल रॅली

triratna

सावळज परीसरात अग्रणी नदीला पुर

triratna

सांगली : वीज बिल वसुलीच्या विरोधात मिरजेत भाजपचे आंदोलन

triratna

सांगली : सत्ता हस्तगत करण्यात यश मिळवले, मात्र भ्रष्टाचार करू देणार नाही

triratna

मिरजेत रुग्णालयात वॉर्डबॉयकडूनच महिलेचा विनयभंग

Shankar_P

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; नराधमांना फाशी दया…

triratna
error: Content is protected !!