तरुण भारत

गोवा डेअरीचे 2 ऑक्टो रोजी सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण

दुध चाचणी मशिन ‘मिल्कास्कॅन’ चे उद्घाटन,  2 ऑक्टो.नंतर ग्राहकांना मिळणार सर्वात सुरक्षित दुध

प्रतिनिधी/ फेंडा

गोवा दुध उत्पादक संघ म्हणजेच गोवा डेअरी येत्या 2 ऑक्टो रोजी सुवर्णमहोत्सवी वर्षात पर्दापण करीत आहे. त्यानिमित्त वर्षभर गोवा डेअरीतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सुवर्णमहोत्सवी उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. महेद्र बाळे यांनी काल कुर्टी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

गोवा डेअरीच्या कुर्टी येथील प्रकल्पाची सुरूवात 2 ऑक्टो 1971 रोजी मुख्यमंत्री स्व. दयानंद बांदोडकर यांच्याहस्ते झाली होती. त्यानुसार गोवा डेअरी  येत्या 2 ऑक्टो. पासून सुवर्णमहोत्सवी वर्षात पर्दापण करीत आहे. कार्यक्रमाच्या सुरळीत आयोजनासाठी गोवा डेअरीतर्फे 19 सदस्यांची समिती निवडण्यात आली आहे. सुवर्णमहोत्सवाची सुरूवात कुर्टी येथील सहकार भवनात दुपारी 3 वा. शानदार सोहळय़ाने होणार आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सहकार मंत्री गोविंद गावडे, आमदार रवी नाईक, कुर्टी खांडेपारचे सरपंच व पंचसदस्य तसेच सरकारी अधिकारी उपस्थित असतील.

मिल्कोस्कॅनमुळे भेसळमुक्त दुध ग्राहकांना मिळणार 

गोवा डेअरीतर्फे ग्राहकांना सुरक्षित व भेसळमुक्त दुध देण्याकडे कल असून खास सुवर्णमहोत्सवी वर्षात एक पाऊल पुढे मारताना दुध चाचणीसाठी मिल्कोस्कॅन  यंत्राची प्रयोगशाळेत स्थापन करण्यात आली आहे. दुधावर प्रक्रिया करण्यापुर्वी  नमूने तपासण्यात येणार असून याद्वारे सुमारे 15 प्रकारे दुधभेसळ पकडली जाणार असून गोवा डेअरी दुधाची सुरक्षितता व विश्वासहर्ता आणखी वाढणार आहे. गोवा डेअरीच्या प्रयोगशाळेत अत्याधुनिक दुध तपासणी यंत्र मिल्कोस्कॅनचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.

त्यानंतर सहकार भवन येथे कार्यक्रम होईल. सुवर्णमहोत्सवी वर्षात दुध पिशव्यावर मिल्कोटेस्टेट दुध व गोल्डन ज्युबिली लोगोचे अनावरण, शेतकरी माहिती पुस्तिका, सहकार खात्यातर्फे एन डी अगरवाल लिखीत पुस्तिकेचे अनावरण मुख्यमंत्र्याहस्ते होईल. सामजित अंतर राखून कार्यक्रमाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

युवा दुध उत्पादकांसाठी मुक्त गोठा पद्धत

युवकांना दुग्ध व्यवसायात ओढ निर्माण करण्यासाठी विविध शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून यावेळी खास मुक्त गोठा पद्धत यावर मार्गदर्शन शिबिरे फोंडा, कोलवाळ, सांखळी व कुडचडे येथे करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना डेअरीची सेवा देताना स्नेह मंदिरात सदिच्छा भेट, सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाअंतर्गत जागतिक आरोग्य दिन, युवा दिन, दुध संकलन वाढविण्यासाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन, शेतकरी दिवस, राष्ट्रीय दुध दिवस, ग्राहक हक्क दिन, कामगार दिन, डॉक्टर्स डे, बालरोग डॉक्टरांचा सन्मान, शिक्षक दिन, महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन होणार असून महोत्सवाची सांगता 2 ऑक्टो. 2021 रोजी होईल. यावेळी उत्कृष्ट दुध उत्पादकांचा सन्मान, सुवर्णमहोत्सवी लघुपट, फेसबुक व इन्स्टाग्राम पेजचे अनावरण, मोबाईल कॉलरटयून व स्मरणिकेच्या प्रकाशनाने सुवर्णमहोत्सवी वर्षाची सांगता करण्यात येणार असल्याची माहिती नितीन कोलवेकर यांनी दिली.

Related Stories

कोलकाता डर्बी एटीके बागानने जिंकली

Amit Kulkarni

पेडणे पोलिसांनी दुचाकी चोरटय़ांकडून 25 लाखांच्या 15 मोटारसायकली जप्त केल्या , तिघांना केली अटक

Omkar B

पणजीत 22 पासून मारुतीराय संस्थान जत्रोत्सव

Omkar B

सालेली सत्तरी गावातील बेकायदेशीर दारु विक्री विरोधात रणरागिणी सरसावल्या

Omkar B

वेर्णा येथे 26 रोजी ‘स्वरधारा’

Patil_p

फोंडा माटोळी बाजाराला अल्प प्रतिसाद

Omkar B
error: Content is protected !!