तरुण भारत

503 नवे रुग्ण, 688 जण कोरोनामुक्त

पाच रुग्णांचा बळी, कोरोना पॉझिटिव्ह दर 30 टक्क्यांवर

प्रतिनिधी/ पणजी

Advertisements

शनिवारी कोरोनामुळे पाच जणांचा बळी गेला असून बळींची एकूण संख्या 391 झाली आहे. काल 503 नव्या रुग्णांची भर पडली तर 688 जणांनी कोरोनावर मात केली. 272 जणांना संशयित कोरोना रुग्ण म्हणून गोमेकॉत भरती करण्यात आले असून 352 जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 31,574 जणांना कोरोनाची बाधा असून 25,759 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 5424 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

 विविध आरोग्य केंद्रांतील कोरोनाबाधितांची आकडेवारी पुढीलप्रमाणे : डिचोली 203, सांखळी 425, पेडणे 229, वाळपई 229, म्हापसा 274, पणजी 330, हळदोणा 131, बेतकी 120, कांदोळी 151, कासारवर्णे 74, कोलवाळ 24, खोर्ली 222, चिंबल 219, शिवोली 222, पर्वरी 392, मये 40, कुडचडे 92, काणकोण 132, मडगाव 409, वास्को 318, बाळ्ळी 56, कासावली 117, चिंचिणी 57, कुठ्ठाळी 263, कुडतरी 31, लोटली 91, मडकई 89, केपे 72, सांगे 90, शिरोडा 18, धारबांदोडा 118, फोंडा 128, नावेली 56.

Related Stories

कुडचडे मतदारसंघात नीलेश काब्राल यांच्यासमोर वाढत्या समस्या

Amit Kulkarni

जुळय़ा नंबरप्लेटसह दारूची तस्करी

Patil_p

डय़ुरँड विजेता एफसी गोवाचे गोव्यात आगमन…….

Amit Kulkarni

डिचोली अबकारी खात्यातर्फे सुमारे 4.50 लाखांची बेकायदेशीर दारू जप्त.

Omkar B

आगामी चोवीस तासांत मुसळधार पावसाची शक्यता

Patil_p

शेळपेतील ‘वरुण ब्रिव्हरेजिस’मध्ये कार्यरत कामगार स्थानिकच

Omkar B
error: Content is protected !!