तरुण भारत

त्या अधिकाऱयांना न्यायालयीन कोठडी

प्रतिनिधी/ बेळगाव

लाच स्वीकारताना सीबीआयने अटक केलेल्या केंद्रिय अबकारी व महसुल कार्यालयातील तीन अधिकाऱयांना 30 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. दोन अधिक्षक व एका निरीक्षकाचा यामध्ये समावेश आहे.

धारवाड येथील विशेष सीबीआय न्यायालयासमोर जीएसटी विभागाचे सुरेश जडगी, मोहनकुमार व वैभव गोयल या तीन अधिकाऱयांना सीबीआयने हजर केले. जीएसटी कमी करण्यासाठी या अधिकाऱयांनी 20 लाखांची लाच मागितली होती. पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना सीबीआयने त्यांना अटक केली आहे.

पानमसाला कंपनीच्या मालकाने दिलेल्या फिर्यादीवरुन बेंगळूर येथील सीबीआयच्या अधिकाऱयांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईने एकच खळबळ माजली असून न्यायालयाच्या आदेशावरुन अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

Related Stories

विजयनगर, दुसरा क्रॉस येथील पाणी समस्या सोडवा

Patil_p

प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर येऊ नये

Patil_p

कोरोनाबाबत नागरिकांनी जागरुक रहावे

Patil_p

बेळगावचा समावेश ऑरेंज झोनमध्ये; लॉकडाऊन शिथिल

Patil_p

एपीएमसीमध्ये कोरोनाची धास्ती वाढली

Patil_p

बेळगाव एपीएमसी अध्यक्षपदी युवराज कदम

Rohan_P
error: Content is protected !!