तरुण भारत

दिघंचीत आरोग्य सेविकेच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, सुमारे चार तोळे सोने लंपास

दिघंची / वार्ताहर

दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असणाऱ्या रिजवाना दस्तगीर शेख यांच्या क्वार्टर मधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे चार तोळे सोने, रोख वीस हजार रुपये असा मोठा ऐवज लंपास केला. सध्या कोरोना ग्रस्तांच्या सेवेमध्ये असणाऱ्या आरोग्य सेविकेच्या घरातच संवेदनशून्य चोरट्यांनी हात साफ केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रिजवाना शेख या गेली तीन वर्षापासून दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सेविका म्हणून सेवा बजावत आहेत. कोरोना महामारीच्या काळात देखील त्यांनी दिवस रात्र अतिशय उत्कृष्ट सेवा बजावली आहे. दिवस रात्र कोरोनाग्रस्तांच्या व अन्य रुग्णांच्या सेवेसाठी धावपळ सुरू असताना बुधवारी 23 सप्टेंबर रोजी दुपारी भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी रिजवाना शेख यांच्या घराचे कुलूप तोडून त्यांच्या कपाटा मधील सुमारे चार तोळे सोने,चांदीची काही दागिने व रोख 28 हजार रुपये असा मोठा ऐवज लंपास केला. एकीकडे शेख या रुग्णांची सेवा बजावत आहेत. तर त्याच वेळी संवेदनहीन चोरट्यांनी रिजवाना शेख यांच्या घरा मधील ऐवज मोठा ऐवज लंपास केला.

सदर घटना घडल्याची कळताच पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ श्वानपथकाला पाचारण करण्यात आले त्याचबरोबर हातांचे ठसे देखील तपासण्यात आले आहेत. याबरोबरच युद्धपातळीवर या चोरीची तपासणी मोहीम आटपाडी पोलिसांनी हाती घेतली आहे. तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन लवकरात लवकर या चोरीचा छडा लावण्याच्या दृष्टीने तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

Related Stories

भाजप अल्पसंख्याक सांगली जिल्हाध्यक्ष शेख यांचा शिवसेनेत प्रवेश

Abhijeet Shinde

दारू पिऊन दंगा करणाऱ्या पोलिसाचे निलंबन

Abhijeet Shinde

मुचंडी येथे शेततळ्यात पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Abhijeet Shinde

सांगली : मिरज शासकीय रुग्णालयात आग प्रतिबंधक प्रात्यक्षिके

Abhijeet Shinde

गांधीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोमात

Abhijeet Shinde

खून करुन सोने, चांदी लांबविणाऱ्याला अटक

Rohan_P
error: Content is protected !!