तरुण भारत

ऑस्ट्रेलियाच्या हिलीकडून धोनीचा विक्रम मोडीत

वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन

ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू ऍलीसा हिलीने भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा टी-20 प्रकारातील यष्टीमागे सर्वाधिक झेल टिपण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. ऍलीसा हिली ही ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची भरवशाची फलंदाज आणि यष्टीरक्षक आहे.

क्रिकेटच्या टी-20 प्रकारात हिलीने येथे न्यूझीलंड विरूद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱया सामन्यात हा पराक्रम केला. भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनीने टी-20 प्रकारात 98 सामन्यांत यष्टीमागे 91 झेल टिपण्याचा विक्रम नोंदविला होता. ऍलीसा हिलीने 114 टी-20 सामन्यात यष्टीमागे 94 झेल टिपण्याचा नवा विक्रम नोंदविला आहे. धोनी सध्या संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नाई सुपर किंग्जचे नेतृत्व करीत आहे. गेल्या 15 ऑगस्ट रोजी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रातील निवृत्तीची घोषणा केली.

Related Stories

केव्हिन डी ब्रुईन सर्वोत्तम फुटबॉलपटू

Patil_p

ऑस्ट्रेलियाच्या मदतीला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर

prashant_c

नीरज चोप्रा आज मायदेशी परतणार

tarunbharat

एकूण 10 क्रिकेटपटूंना किमान 2 कोटीची बोली

Patil_p

स्पोर्टिंग प्लॅनेट संघाकडे फँको चषक

Omkar B

महाराष्ट्राविरूद्ध ओडिसाची 5 बाद 220 धावांपर्यंत मजल

Patil_p
error: Content is protected !!