तरुण भारत

सातारा : “आमचे गाव, आमची जबाबदारी” मोहिमेसाठी राजाचे कुर्ले ग्रामस्थांची एकजूट

लोकवर्गणीतून केली ऑक्सिजनयुक्त बेडची सोय

प्रतिनिधी / औंध

Advertisements

कोरोनाचा मुकाबला करायचा आहे मग प्रशासनावर किती काळ अवलंबून रहायचे ? आपले गाव आपली जबाबदारी या मोहिमेसाठी राजाचे कुर्ले गावातील शेकडो हात सरसावले आणि लोकांच्या वर्गणीतून गावात ऑक्सिजनयुक्त बेडची सुविधा निर्माण करण्यात ग्रामस्थांना यश मिळाले. फ्रेंड्स ग्रुप सोशल फौंडेशनने याकरिता पुढाकार घेतला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गावागावात मोठ्या प्रमाणावर बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोविड सेंटरमध्ये बेड उपलब्ध होत नाहीत. प्रशासन देखील सातत्याने यासाठी प्रयत्नशील असले तरी वाढत्या संसर्गामुळे समस्या निर्माण झाली आहे. बाधित रुग्णाला कोविड सेंटरमध्ये बेड उपलब्ध होईपर्यंत गावात त्याच्यावर उपचार करून त्याचे प्राण वाचले पाहिजेत याकरिता गावोगावी ऑक्सिजन बेडची चळवळ उभी रहात आहे.

राजाचे कुर्ले ग्रामस्थांनी देखील लोकवर्गणीतून गावात आँक्सिजनची सुविधा असलेल्या बेडची सुविधा निर्माण केली आहे. गावात खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणारे वैद्यकीय अधिकारी इथे सेवा देणार आहेत. फ्रेंड्स ग्रुप सोशल फौंडेशनने केलेल्या आवाहनाला गावातील ग्रामस्थांनी आर्थिक मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या सहकार्यामुळे राजाचे कुर्ले,गिरीजशंकरवाडी व आंबेदरवाडी या गावातील ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी एक ऑक्सिजन मशीन, एक टेम्प्रेचर सेन्सर, 2 ऑक्सिपल्स मीटर,2ऑक्सिप्रेकॅन व 5 PPE किट स्वामी विवेकानंद ग्रंथालय व पेपर वाचनालयात” 24 तास उपलब्ध करून देण्यात आले आहे.

कोरोनाशी लढण्यास ग्रामस्थ खंबीर
ग्रामस्थांनी एकजुटीने गावात सुविधा निर्माण केली आहे. गावातील कार्यरत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा, मदतनीस, ग्रामपंचायत यांच्या मदतीने हे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही सामाजिक संस्था म्हणून कार्य हातात घेतले आहे.यामुळे गावात सकारात्मक वातावरण तयार होऊन गावकरी कोरोनाशी लढण्यास आणखी सक्षम झाले आहेत.
प्रशांत गुरव,फ्रेंडस ग्रुप सोशल फौंडेशन

Related Stories

जिह्यात मान्सूनने जोर पकडला

Patil_p

सातारा जिल्ह्यातील 346 कोरोना बाधित ; तर 9 मृत्यू

triratna

ओबीसी राजकीय आरक्षण रद्दला राज्य सरकार जबाबदार

datta jadhav

पत्नीच्या निधनाच्या विरहाने पतीचे हि निधन

Patil_p

पालिकेच्या सभापती निवडी बिनविरोध

Patil_p

जावलीत कोरोनाचा पुन्हा वाढतोय प्रादुर्भाव

Omkar B
error: Content is protected !!