तरुण भारत

पंजाब : गेल्या 24 तासात 2,299 रुग्ण कोरोनामुक्त!

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. त्यातच पंजाबमधून एक दिलासादायक बाब समोर आली आहे. पंजाबमध्ये मागील 24 तासात 2,299 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 88 हजार 312 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी 1 हजार 458 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 50 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 10 हजार 106 इतका झाला आहे. तर आतापर्यंत 3 हजार 238 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

  • 18,556 रुग्णांवर उपचार सुरू 


ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 17 लाख 63 हजार 498 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 18 हजार 556 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 451 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 63 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 

Related Stories

दिल्ली : शेतकरी थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार

datta jadhav

दिल्लीतील कोरोना रुग्णांनी ओलांडला 6.35 लाखांचा टप्पा

Rohan_P

‘हेट स्पीच’ची व्याख्या ठरविणार गृह मंत्रालय

Patil_p

राज्यातील रुग्णसंख्या 7 हजार

Patil_p

दिल्लीत ऑक्सिजनअभावी आणखी 20 रुग्णांचा मृत्यू

datta jadhav

कराडच्या जवानाला वीरमरण

Patil_p
error: Content is protected !!