तरुण भारत

संजीवनी कारखाना लवकरात लवकर सुरू करा

लवकरात लवकर सुरू करा, आमदार प्रसाद गावकर यांची मागणी

प्रतिनिधी/ सांगे

Advertisements

संजीवनी साखर कारखान्याला संजीवनी देण्यासाठी तो सहकार खात्याकडून कृषी खात्याकडे हस्तांतरित करण्याचा जो महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शेतकऱयांचे हित डोळय़ांसमोर ठेऊन घेतलेला आहे त्याचे आपण स्वागत करतो, असे सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आपल्या सांगे येथील कार्यालयात बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. कारखाना लवकरात लवकर चालू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

यापूर्वी माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या कारकिर्दीत हाच विचार पुढे आला होता. तसेच गेल्या आठवडय़ात वाडे येथे झालेल्या ऊस शेतकऱयांच्या बैठकीत आपण हीच मागणी केली होती. त्यावर तत्काळ मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेऊन शेतकऱयांना दिलासा दिला आहे. याबद्दल शेतकरी समाधानी असल्याने ते म्हणाले.

केंद्राच्या मदतीने 60-40 चा फॉर्म्युला वापरून कारखान्याचे नूतनीकरण करण्यासाठी किंवा नवीन कारखाना उभा करण्यासाठी आता वेळ न दवडता प्रयत्न होण्याची गरज गावकर यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय कृषी योजनेच्या अंतर्गत केंद्राचा 60 टक्के हिस्सा, तर राज्य सरकारचा 40 टक्के हिस्सा वापरून कारखाना सुरू करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

यापुढे ऊस शेतकऱयांना नाउमेद न करता त्याच्ंया उत्साह वाढविण्याची गरज आहे. गेल्या वर्षी लैला साखर कारखान्याला जो ऊस पाठविला गेला त्यावर प्रति टन 9 ते 9.5 हजार रुपये खर्च केला गेला. ऊसाच्या वाहतुकीवर जो खर्च झाला तो भरमसाठ आहे. मात्र कारखान्याकडे असलेली साखर किती तरी पटीने कमी दरात विकण्यात आली. अशा पद्धतीने नुकसान करून संजीवनीच्या नुकसानाचा आकडा फुगत गेला. कृषिमंत्री बाबू कवळेकर यांनी प्राधान्यक्रमाने लक्ष देऊन कारखाना सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली.

राजकारण होत असल्याबद्दल नाराजी

आंदोलन करण्याचा निर्णय ऊस उत्पादक संघटनेचा होता, आपला नाही. शेतकऱयांवर जर अन्याय होत असेल, तर आपण त्यांच्याशी बोलून योग्य तो निर्णय घेणार, असे गावकर यांनी सांगितले. या विषयावर राजकारण होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. सर्वाधिक ऊस शेतकरी असलेल्या भागाचा आपण आमदार आहे हे लक्षात घेतले पाहिजे, असे ते म्हणाले.

Related Stories

म्हादईच्या रक्षणासाठी मगोचे आंदोलन

Patil_p

सर्व मागण्यांवर मेळावली आंदोलक ठाम

Patil_p

सत्तेवर आल्यास राज्य पातळीवर ओपिनियन पोल दिवस साजरा करू : काँग्रेस

Amit Kulkarni

वाळके खुनाचे ‘मायनिंग कनेक्शन’?

Patil_p

फातोर्डा भाजपच्या प्रशिक्षण शिबिरात कार्यकर्त्यांचा उत्तम प्रतिसाद

Patil_p

विद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर

Patil_p
error: Content is protected !!