तरुण भारत

तहसीलदारांनी बजावली दिड लाखाच्या दंडाची नोटीस

वार्ताहर / वरकुटे – मलवडी

माण तालुक्यातील वरकुटे – मलवडी येथील खरातवाडी व पाटलूची वस्तीतील ओढय़ात झालेल्या वाळू उत्खननाचा दि. 18 रोजी गावकामगार तलाठी यांनी पंचनामा केला होता . सदर वाळू उत्खननाची गंभीर दखल महसूल प्रशासनाने घेतली असून तहसीलदार बी.एस.माने यांनी धडक कारवाई करत संबंधितांना 1 लाख 44 हजार रुपये दंडाची नोटीस बजावली आहे. त्यामुळे अवैध वाळू उत्खनन करणायाचे धाबे दणाणले असून या कारवाईने वरकुटे – मलवडीत राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाला आळा बसण्यास मदत होणार आहे. 

Advertisements

           वरकुटे – मलवडी (खरातवाडी ) येथील किरण प्रकाश जाधव व लहू रखमाजी मिसाळ यांना ही नोटीस दिलेली आहे. त्यांना लेखी खुलासा करण्याबाबत चोवीस तासांचा अवधी नोटीसमध्ये नमूद केलेला आहे. संबंधितांना चोवीस तासाच्या आतच खुलासा तहसीलदार कार्यालयात सादर केला आहे. याबाबतची सुनावणीची तारीख सुद्धा तहसीलदार यांनी दिलेली आहे. 

          वरकुटे – मलवडी येथील खरातवाडी हद्दीत किरण जाधव व लव्हू मिसाळ हे दि. 18 आँगस्ट रोजी दु.12.35 वा. च्या सुमारास ट्रँक्टर व ट्राँलीद्वारे विनापरवाना वाळू उत्खनन व वाहतूक करीत असताना गाव गावकामगार तलाठी यांना दिसून आला असून तलाठी यांनी उत्खनन केलेल्या ओढय़ातील पंचनामा केला असून सदर ठिकाणी त्यांना 4 चार ब्रास वाळू उत्खनन केल्याचे दिसून आले. त्याबाबत तहसीलदार कार्यालयात तलाठी यांनी पंचनामा सादर केला आहे. तहसीलदार बी .एस. माने यांनी किरण जाधव व लहू मिसाळ यांना दंडाची नोटीस दिलेली आहे. 

         वरकुटे – मलवडी येथे विनापरवाना वाळू उत्खनन मोठय़ा प्रमाणात होत असल्याबाबत तहसीलदार बी.एस.माने यांनी गाव कामगार तलाठी यांना धडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यावरून सदरचा पंचनामा महसूल कार्यालयाकडे तलाठी यांनी सादर केला होता. यावरून वरकुटे – मलवडी येथील खरातवाडी हद्दीतील ओढय़ातून 4 ब्रास वाळू उत्खनन केल्याबाबत 6 हजार गौण खनिजांचे प्रतिब्रास बाजार मूल्य पकडून राँयल्टी प्रतिब्रास 5869रूपये प्रमाणे बाजारमूल्याच्या पाचपट मिळून दंडाची  रक्कम 1 लाख 44 हजार 76 दंडाच्या रक्कमेची नोटीस किरण जाधव व लहू मिसाळ यांना तहसीलदार बी.एस.माने यांनी बजावली आहे. 

          वरकुटे – मलवडी येथे गावकामगार तलाठी यांना ट्रँक्टर व ट्राँलीद्वारे  अवैध वाळू उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आले असताना त्यांनी त्यांचा पाठलाग केला होता परंतु सापडले नाहीत. वाळू उत्खनन झालेल्या जागेचा तलाठय़ांनी पंचनामा केला आहे. संबंधितांनी कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नसल्याने पंचनामा करण्यात आला होता. वरकुटे – मलवडी येथे गेले कित्येक वर्षापासून आठ ते दहा जणांनी अवैधरित्या वाळू उत्खननाचा गोरखधंदा सुरू केला असून फुकटात वाळू उपसा करून तो हजारो रुपयांना विकली जाते. वरकुटे – मलवडी येथील अवैध वाळू उत्खननाला प्रशासनाकडून आजतागायत डोस कारवाई झाली नसल्याने पडद्यामागून लोकप्रतिनिधींचा वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात वार्षिक उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ

Patil_p

महाराष्ट्रात मागील 24 तासात 8,535 नवीन कोरोना रुग्ण; 156 मृत्यू

Rohan_P

सातारा : राजधानी किल्ले अजिंक्यताऱ्यावर सापडला नवा चौथरा

Abhijeet Shinde

कराड वाखाणमध्ये कृष्णाकाठी मगरीचे दर्शन

Amit Kulkarni

सातारा : मूकबधीर वृद्धेवर बलात्कार करणार्‍या संशयितास अटक

Abhijeet Shinde

छ. शाहू महाराजांच्या नावे कोल्हापूरात क्रीडा विद्यापीठाची स्थापना करा – खासदार माने

Abhijeet Shinde
error: Content is protected !!