तरुण भारत

टेम्पो-दुचाकी अपघातात भिवशीचा तरुण ठार

कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावरील घटना

कागल / प्रतिनिधी

Advertisements

कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावर, लक्ष्मी टेकडीजवळ छोटा टेम्पो आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात निपाणी तालुक्यातील भिवशी येथील मधुकर नाना पाटील (वय 43) या मोटारसायकलस्वाराचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी दुपारी सव्वा बारा वाजता ही घटना घडली आहे.

  कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधून कळंबा येथील सुरज नाईक हा टेम्पोमधून ऑक्सिजनच्या टाक्या घेऊन कोल्हापूरला चालला होता. लक्ष्मी टेकडीजवळ आल्यानंतर एमआयडीसी रोडवरील चौकात वळण घेत असलेल्या दुचाकीस्वाराला भरधाव वेगातील टेम्पोने ठोकरले. तसेच मोटारसायकलस्वाराला काही अंतर फरफटत नेले. यामध्ये पाटील हे गंभीर जखमी झाले. टेम्पो चालक आणि मालक यांनी अपघातातील जखमी मधुकर नाना पाटील यांना उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान मधुकर पाटील यांचा मृत्यू झाला.

  पाटील हे निपाणी तालुक्यातील भिवशी येथील आहेत. घटनास्थळी कागल आणि गोकुळ शिरगांव पोलिसांनी भेट दिली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. तसेच कागल पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत. रात्री उशीरा या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Related Stories

त्या म्होरक्मयावर कारवाईचे आदेश

sachin_m

बेळगाव-हुक्केरीतील पाच जणांना कोरोना

Patil_p

पुणे-बेळगाव रेल्वे सेवा 9 फेब्रुवारीपासून

prashant_c

आता कॅनमध्येही मिळणार नाही पेट्रोल

Patil_p

बंगाली कारागिरांनी पळविले दोन किलो सोने

Amit Kulkarni

करिअर पॉईंटच्या बेळगाव शाखेचे उद्घाटन

Amit Kulkarni
error: Content is protected !!